भारताच्या युवा खेळाडूंना लवकरच ऑस्ट्रेलियासमोर खडतर परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. कारण दोन्ही देशांच्या अंडर-19 संघांमध्ये वनडे तसेच 4 दिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन 50 षटकांचे सामने आणि दोन चार दिवसीय सामने होणार आहेत. जे अनुक्रमे पुद्दुचेरी आणि चेन्नई येथे खेळले जाणार आहेत. यासाठी बीसीसीआयने आज शनिवारी (31 ऑगस्ट) वेगवेगळ्या संघांची घोषणा केली. ज्यामध्ये सर्वात लोकप्रिय राहुल द्रविडच्या मुलाचे नाव सामिल आहे.
खरे तर, 18 वर्षीय समित द्रविड हा उजव्या हाताचा खेळाडू आहे. जो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये योगदान देण्यास सक्षम आहे. समित मधल्या फळीत फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजीसाठी ओळखला जातो. 2023-24 कूचबिहार ट्रॉफीमध्ये कर्नाटकच्या विजेतेपदात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. या युवा अष्टपैलू खेळाडूने 8 सामन्यात 362 धावा केल्या होत्या. समितने जम्मू आणि काश्मीरविरुद्ध 98 धावांची खेळीही खेळली. ज्यामुळे त्याला क्रिकेटच्या क्षेत्रात सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात मदत झाली. त्याने गोलंदाजीतही योगदान दिले. स्पर्धेत त्याने 16 बळी घेतले. याशिवाय समितने अलूर येथील लँकेशायर संघाविरुद्धच्या तीन दिवसीय सामन्यात कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन 11 चे प्रतिनिधित्व केले आहे. नुकतेच या समितला महाराजा टी-20 ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळाली.
🚨 NEWS 🚨
India U19 squad and fixtures announced for multi-format home series against Australia U19.
Squad for one-day series: Rudra Patel (VC) (GCA), Sahil Parakh (MAHCA), Kartikeya KP (KSCA), Mohd Amaan (C) (UPCA), Kiran Chormale (MAHCA), Abhigyan Kundu (WK) (MCA), Harvansh…
— BCCI (@BCCI) August 31, 2024
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाचा अंडर-19 संघ
एकदिवसीय मालिकेसाठी संघ: मोहम्मद अमन (कर्णधार), रुद्र पटेल (उपकर्णधार), साहिल पारख, कार्तिकेय केपी, किरण चोरमले, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंशसिंग पंगालिया (विकेटकीपर), समित द्रविड, युधाजित गुहा, समर्थ एन, निखिल कुमार, चेतन शर्मा, हार्दिक राज, रोहित राजावत, मोहम्मद अनन
चार दिवसीय मालिकेसाठी संघ : सोहम पटवर्धन (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, नित्या पांड्या, विहान मल्होत्रा (उपकर्णधार), कार्तिकेय केपी, समित द्रविड, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंशसिंग पानगालिया (विकेटकीपर), चेतन शर्मा, समर्थ एन, आदित्य रावत, निखिल कुमार, अनमोलजीत सिंग, आदित्य सिंग, मोहम्मद अनन
ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारतीय संघाच्या 19 वर्षांखालील संघाचे वेळापत्रक
21 सप्टेंबर: पहिली वनडे, पुद्दुचेरी
23 सप्टेंबर: दुसरी वनडे, पुद्दुचेरी
26 सप्टेंबर: तिसरी वनडे, पुद्दुचेरी
30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर – पहिला चार दिवसीय सामना, चेन्नई
7 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर – दुसरा चार दिवसीय सामना, चेन्नई
हेही वाचा-
यूएस ओपनमध्ये आणखी एक अपसेट, गतविजेता नोवाक जोकोविच तिसऱ्या फेरीतूनच बाहेर
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे टॉप 5 गोलंदाज, यादीत एकही भारतीय नाही!
भारतीय संघाला मोठा धक्का! बुची बाबू स्पर्धेत वर्ल्ड कप हिरो दुखापतग्रस्त