माजी भारतीय प्रशिक्षक आणि क्रिकेटर राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. म्हैसूर वॉरियर्सने 2024 च्या महाराजा ट्रॉफी टी20 मध्ये समितचा समावेश केला आहे. म्हैसूर संघाने समितला 50 हजार रुपयांना विकत घेतले आहे. समित पहिल्यांदाच या मोठ्या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. 18 वर्षीय अष्टपैलू समित हा कूचबिहार ट्रॉफीमध्ये कर्नाटकच्या अंडर19 संघाचा भाग आहे. समित व्यतिरिक्त म्हैसूर संघात करुण नायर, कृष्णप्पा गौतम आणि प्रसीध कृष्णासारखे दिग्गज खेळाडू आहेत.
समित द्रविड फलंदाजीसोबतच मध्यमगती गोलंदाजही आहे. त्याने 2023-24 मध्ये कर्नाटक अंडर19 संघाच्या वतीने कूचबिहार ट्रॉफीमध्ये भाग घेतला आहे. तो अलूर येथे पाहुण्या संघ लँकेशायर विरुद्ध कर्नाटक क्रिकेट असोसिएशन संघाकडून खेळला आहे. समित करुण नायरच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे, ज्याला संघाने कर्णधारपदी कायम ठेवले आहे. वॉरियर्सने अष्टपैलू के गौतमला 7.4 लाख रुपयांमध्ये जोडले. तर, जे. सुचितला 4.8 लाख रुपयांना विकत घेतले आहे.
The first step towards creating his legacy! Welcome aboard, Samit Dravid 💛#MysoreWarriors #GoWarriors #CricketTwitter pic.twitter.com/kN48J0vWY4
— Mysore Warriors (@mysore_warriors) July 25, 2024
म्हैसूर वॉरियर्स संघ: करुण नायर, सीए कार्तिक, एस.यू. कार्तिक, मनोज भंडगे, जे सुचित, के. गौथम, विद्याधर पाटील, व्यंकटेश एम, हर्षिल धर्मानी, गौतम मिश्रा, धनुष गौडा, समित द्रविड, दीपक देवाडिगा, सुमित कुमार, स्मयन श्रीवास्तव, जॅस्पर ईजे, प्रसीद कृष्णा, मोहम्मद सर्फराज अश्रफ
महाराजा ट्राॅफीचे आयोजन 15 सप्टेंबर पासून 1 ऑक्टोंबर दरम्यान होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने बंगळुरु येथील चिन्नास्वामी स्टेडियम येथे होणार आहे. आता राहुल द्रविडचा मुलगा या स्पर्धेत कशाप्रकारे पदार्पण करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेही वाचा-
टाॅस होताच हृदय तुटणार! पहिल्या टी20 सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून हे 3 खेळाडू होणार बाहेर!
भारताची मान उंचावली! तिरंदाजांनी पदकाच्या दिशेने घेतली झेप..
Asia Cup 2024: सेमीफायनल सामन्यापूर्वी भारताच्या स्टार खेळाडूनं केलं मोठं वक्तव्य!