क्रिकेटविश्वातून आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि दिग्गज माजी फलंदाज राहुल द्रविड याचा मुलगा समित द्रविड याची विनू मंकड स्पर्धेसाठी कर्नाटकच्या 19 वर्षांखालील संघात निवड झाली आहे. समित आतापर्यंत कर्नाटककडून 14 वर्षांखालील स्पर्धांमध्ये खेळत होता. मात्र, आता त्याने 19 वर्षांखालील क्रिकेटमध्येही पाऊल ठेवले आहे.
हैदराबादमध्ये वनडे स्पर्धा
विनू मंकड वनडे स्पर्धेचे (Vinoo Mankad Tournament) आयोजन हैदराबादमध्ये 12 ते 20 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. समित द्रविड (Samit Dravid) यापूर्वी 14 वर्षांखालील क्रिकेटमध्ये चमकला आहे. त्याने 2019-20च्या हंगामात दोन द्विशतक झळकावले होते. समित वडील राहुल द्रविड (Rahul Dravid) याच्याप्रमाणे जास्त बचावात्मक फलंदाजी करत नाही. तो आक्रमक फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो.
Rahul Dravid's son Samit Dravid picked for Karnataka in the U19 Vinoo Mankad Trophy. pic.twitter.com/QDA3LJj8iI
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 23, 2023
चांगली गोलंदाजी करतो समित
याव्यतिरिक्त समित चांगली गोलंदाजीही करतो. विनू मंकड स्पर्धेत कर्नाटक संघ धीरज गौडा याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. तसेच, ध्रुव प्रभाकर संघाचा उपकर्णधार असणार आहे. समितसोबत संघात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत, जे या स्पर्धेत आपली छाप सोडण्यासाठी उत्सुक आहेत.
भारताच्या यशस्वी क्रिकेटपटूंपैकी एक द्रविड
खरं तर, समित आणि अन्वय यांचा वडील असलेला राहुल द्रविड याला कोणत्याही परिचयाची गरज नाहीये. त्याची गणना भारताच्या सर्वात यशस्वी क्रिकेटपटूंमध्ये होते. द्रविडने भारताकडून 509 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात 344 वनडे आणि 164 कसोटी सामन्यांचा समावेश आहे. त्याच्या नावावर भारताकडून फक्त 1 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्याची नोंद आहे. द्रविडने 164 कसोटी सामन्यात 52.31च्या सरासरीने 13288 धावा केल्या आहेत. तसेच, 344 वनडे सामन्यात 39.16च्या सरासरीने 10889 धावा केल्या आहेत. वनडेत राहुलच्या नावावर 12 आणि कसोटीत 36 शतकांची नोंद आहे. (rahul dravid son samit selected in karnataka under 19 cricket team know more)
महत्त्वाच्या बातम्या-
‘जर मी गोलंदाज असतो, तर…’, Mankading विषयी ईश सोधीच्या विधानाची सर्वत्र चर्चा
वनडे मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया एक पाऊल दूर, पण कशी असेल इंदोरची खेळपट्टी आणि हवामान?