भारतीय क्रिकेट संघ लंडनमधील ओव्हल स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामना खेळणार आहे. ही स्पर्धा 7 जूनपासून सुरू होईल. तसेच या सामन्यावेळी सर्वांच्या नजरा भारतीय संघात पुनरागमन करत असलेल्या अजिंक्य रहाणे याच्यावर असतील. आधी देशांतर्गत क्रिकेट व त्यानंतर आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करून त्याने आपले पुनरागमन साध्य केले आहे. अशाच तो भविष्यातही भारतीय संघात दिसू शकतो का? याबाबत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
अजिंक्य रहाणे याने यावर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली होती. त्यानंतर आयपीएलमध्ये आपल्या आक्रमक खेळाने त्याने सर्वांची मनी जिंकली. त्यामुळेच त्याला या अंतिम सामन्यासाठी संधी मिळाली आहे. आयपीएलच्या आधी झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत श्रेयस दुखापतग्रस्त झाल्याने, रहाणेला त्याच्या जागी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळेल.
अय्यरने पुनरागमन केल्यानंतरही अजिंक्य संघात असेल का असे विचारल्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले,
“या अंतिम सामन्यात किंवा त्यानंतरही चांगली कामगिरी केल्यास तो नक्कीच भारतीय संघात असेल. चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूला डावलता येत नाही. अजिंक्य कोणत्या दर्जाचा क्रिकेटपटू आहे हे आपण सर्वजण जाणतो. तो कर्णधार होता आणि त्याच्याकडे अपार अनुभव देखील आहे. तो संघात असल्याचा सर्वांना आनंदच आहे.”
भारतीय संघ सलग दुसऱ्या सायकलमध्ये या स्पर्धेचा अंतिम सामना खेळतोय. मागील वेळी भारतीय संघाला अंतिम सामन्यात न्यूझीलंडने पराभूत केले होते. त्यावेळी अजिंक्य यानेच भारतासाठी सर्वाधिक 49 धावा केल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
(Rahul Dravid Speaks On Ajinkya Rahane Future In Team India After Shreyas Iyer Comeback)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हेजलवूडच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात सामील झालेला पठ्ठ्या आहे तरी कोण, भारताची डोकेदुखी वाढवणार का?
Cricket Ball: डब्ल्यूटीसी फायनलमध्ये वापरला जाणार Duke Ball, ‘या’ 3 चेंडूंनी आख्खं जग खेळतं क्रिकेट