भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही महिन्यांपासून सतत फ्लॉप ठरतोय. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचे शतक २०१९ मध्ये बांगलादेश संघाविरुद्ध झळकावले होते. त्यानंतर २ वर्षे उलटून गेले तरीदेखील त्याला शतक झळकावता आले नाहीये. सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला कसोटी आणि वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेत विराट कोहली शतक झळकावेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी विराट कोहलीच्या फलंदाजीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.
राहुल द्रविडने विराट कोहलीच्या फलंदाजीबाबत भाष्य करत म्हटले की, “त्याने चांगली फलंदाजी केली. त्याला चांगली सुरुवात मिळाली होती, परंतु त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. परंतु मला आता असे वाटते की, लवकरच तो मोठी खेळी करेल. संघात त्याला पाहून असे वाटते की, तो प्रत्येक गोष्ट आरामात करत आहे. असं होऊ शकतं की, हे पुढील सामन्यात होणार नाही. परंतु येणाऱ्या काही सामन्यात नक्की होईल.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “मला तर असे वाटते की, त्याच्यासारखा मोठा खेळाडू एकदा फॉर्ममध्ये परतला. तर त्याच्याकडून अनेक मोठ्या खेळ्या पाहायला मिळणार आहेत. गेल्या २ आठवड्यापासून जे काही सुरू आहे, त्यामध्ये त्याने स्वतःला सावरत भारतीय संघाची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली.”(Rahul Dravid statement predicts that Virat Kohli will score big in upcoming matches)
तसेच भारतीय संघातील मुख्य फलंदाज चेतेश्वर (Cheteshwar pujara) पुजारा देखील काही महिन्यांपासून फलंदाजीमध्ये संघर्ष करताना दिसून येत आहे. याबाबत बोलताना राहुल द्रविड म्हणाले की, “मला वाटते की तो चांगली कामगिरी करतोय. नक्कीच तो मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्याने आपल्या १० वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत घवघवीत यश मिळवलं आहे. त्यामुळे तो किती उंचीवर आहे आणि त्याने कोणत्या प्रकारचे यश मिळवले आहे हे त्याला चांगलच माहीत आहे.”
महत्वाच्या बातम्या :
…आणि चेतन शर्मा यांच्यावर आली होती तोंड लपवून फिरण्याची वेळ, जाणून घ्या पूर्ण प्रकरण
दुसऱ्या कसोटीपूर्वी द्रविडने रहाणे-पुजाराच्या फॉर्मविषयी दिली महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया; म्हणाला…
हे नक्की पाहा :






