भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्ममध्ये आहे. अशात अनेकदा नेटकरी आणि टीकाकार विराटकडे निवृत्ती घेण्याची मागणीही करत असतात. दरम्यान सध्या विराट ज्या कठीण काळातून जात आहेत, अगदी तशीच परिस्थिती भारताच्या काही माजी खेळाडूंवर देखील आली होती. परंतु हे खेळाडू या परिस्थितीला सामोरे जाऊ न शकल्यामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. आपण या लेखात अशाच चार भारतीय दिग्गजांची माहिती घेणार आहोत, ज्यांनी खराब फॉर्ममुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
विरेंद्र सेहवाग –
क्रिकेटच्या इतिहासातील विस्फोटक सलामीवीरांचा जेव्हा कधी उल्लेख केला जाईल, तेव्हा विरेंद्र सेहवाग (Virendाी Sehwag) हे नाव त्यामध्ये प्रामुख्याने घेतले जाईल. सेहवागने त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे कसोटी क्रिकेटला पूर्णपणे वेगळे वळण दिले होते. भारतासाठी तिहेरी शतक मारणारा सेहवाग पहिला फलंदाज आहे. परंतु त्याच्या कारकिर्दीचा शेवट अपेक्षेप्रमाणे झाला नव्हता.
२०११ साली सेहवागने वनडे सामन्यात द्विशतक केले होते आणि त्यानंतर त्याच्या प्रदर्शाला उतरती कळा लागली होती. २०१२-१३ मध्ये त्याला त्याला अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. २०१० मध्ये खेळलेल्या एका कसोटी सामन्यात सेहवागने शतक केले होते, त्यानंतर खेळलेल्या तब्बल ४० डावांमध्ये तो फक्त एक शतक करू शकला होता. कसोटी संघातून बाहेर असताना अखेर २०१५ मध्ये सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता.
दिलीप वेंगसरकर –
भारताच नाही जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये जांची गणना केली जाते, त्या दिलीप वेंगसरकर (dilip vengsarkar) यांनीही खराब फॉर्ममुळेच क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. १९८० च्या दशकात वेंगसरकरांसाठी १९८८ ते १९९२ हा काळ खूपच खडतर राहिला होता. यादरम्यान त्यांनी १८ कसोटी सामन्यांमध्ये एकही शतक केले नव्हते. नेहमी ४२ च्या सरासरीने धावा करणाऱ्या वेंगसरकरांनी यादरम्यान २२ च्या सरासरीने धावा केल्या होत्या. १९९१-९२ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ५ कसोटी सामन्यात त्यांची सरासरी १७ पर्यंत घसरली होती. या सततच्या खराब प्रदर्शानाला कंटाळून त्यांनी या दौऱ्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता.
राहुल द्रविड –
कसोटी क्रिकेटमध्ये ‘द वॉल’ नावाने ओळखला जाणारा राहुल द्रविड (Rahul Dravid) देखील खराब फॉर्ममुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब झाला होता. द्रविडने भारतासाठी १६४ कसोटी सामने खेळले आणि यामध्ये ३६ शतकांच्या मदतीने १३२८८ धावा केल्या. असे असले तरी, काही सामन्यांमधील खराब प्रदर्शनाने त्याची कारकीर्द संपवली. २०१२ साली झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात द्रविड धावा करण्यात अपयशी ठरला होता आणि याचा कारणास्तव त्याने अचानक निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या निर्णयानंतर क्रिकेटविश्वात खळवड उडाली होती. शेवटच्या १० कसोटी डावांमध्ये धावा करता आल्या नाहीत आणि ज्या पद्धतीने तो बाद झाला, त्यामुळेच द्रविडने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
वीवीएल लक्ष्मण –
दिग्गज वीवीएल लक्ष्मय (vvs laxman) यानेही खराब फॉर्ममुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कोलकाता कसोटी सामन्यात २८१ धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. परंतु वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात लक्ष्मणची बॅट पूर्णपणे शांत राहिली. याच पार्श्वभूमीवर त्याने स्वतःची निवृत्ती घोषित केली होती. २०११ साली कोलकत्यामध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या एका सामन्यात १७६ धावांची खेळी केल्यानंतर त्याने लय गमावली होती आणि ऑस्ट्रेलिया दौरा त्याच्यासाठी शेवटचा ठरला होता. हैदराबादमध्ये मायदेशातील चाहत्यांपुढे तो निवृत्ती घेऊ शकत होता, पण त्याने कारकीर्द खेचण्यात काहीच अर्थ नसल्याचे स्पष्ट केले आणि निवृत्ती घेतली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
नाचा रे! लेकींसोबत पुन्हा थिरकला वॉर्नर, वरुण धवनच्या ‘नाच पंजाबन’ गाण्यावरील डान्स व्हिडिओ व्हायरल
फाॅर्मात नसलेल्या कोहलीसाठी इंग्लंडच्या कॅप्टनची फलंदाजी; म्हणाला, ‘तुम्ही असे कसे….’