सेंच्युरियन । भारतीय संघ आज दक्षिण आफ्रिकेत ३ सामन्यांच्या मालिकेत सलग दुसरा सामना पराभूत झाला. यामुळे २५ वर्षांत प्रथमच आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकायच्या भारताच्या स्वप्नांना चांगलाच सुरुंग लागला.
मोठी अपेक्षा ठेवून संघ या दौऱ्यावर गेला होता. येवेळी भारतीय गोलंदाजीची भक्कम होती. परंतु फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारताला पराभवाला सामोरे जावे लागले.
भारतीय संघ आजपर्यंत कधीही ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका देशांत कसोटी मालिका जिंकला नाही. तर राहुल द्रविड हा ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका किंवा इंग्लंड देशात कसोटी सामना जिंकणारा शेवटचा कर्णधार आहे.
२००७ साली जेव्हा भारतीय संघ इंग्लंडमध्ये १-०ने कसोटी मालिका जिंकला होता. तेव्हा संघाचा कर्णधार राहुल द्रविड होता. त्यानंतर भारतीय संघ कधीही ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका किंवा इंग्लंड यातील कोणत्याच देशात कसोटी सामना जिंकला नाही.
३ सामन्यांच्या मालिकेत तेव्हा पहिला आणि तिसरा सामना अनिर्णित राहिला होता तर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर ७ विकेट्सने विजय मिळवला होता.