जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवाला. डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात भारतीय संघ पहिल्या दिवसापासून पिछाडीवर होता आणि ऑस्ट्रेलियन संघाने आपले वर्चस्व शेवटच्या दिवसापर्यंत कायम ठेवले. सामना संपल्यानंतर भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने पराभवाची काही कारणे सांगितली, पण त्यापेभा ऑस्ट्रेलियाला मिळालेला विजय त्याला जास्त महत्वाचा वाटतो. द्रविडने अगती थोडक्या शब्दांमध्ये ऑस्ट्रेलियाचे अभिनंतर केले.
ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या पराभवानंतर द्रविडने भारतीय संघाच्या व्यस्त वेळापत्रकाचे कारण दिले. सोबतच डब्ल्यूटीसीची गदा जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचेही थोडक्यात आभिनंदन केले. सामना संपल्यानंतर माध्यमांसमोर द्रविड म्हणाला, “डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी केलेली तयारी माझ्यासाठी कधीच समाधानकारक नव्हती. मला ते मान्य देखील आहे आणि आपण सर्वांनी ते मान्य केले पाहिजे. वेळापत्रक खूपच व्यस्त होते. संघातील खेळाडूंनाही माहिती आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना काय गरजेचे आहे. दौऱ्याच्या ठिकाणी तीन आढवडे आधी आलो आणि दोन सराव सामने खेळले, तर संघ चांगले प्रदर्शन करू शकतो. आम्हालाही तो वेळ हवा होता. पण परिस्थिती तशी नव्हती.”
“व्यस्त वेळापत्रकात संघ जे करू शकत होता, ते आम्ही केले. असे असले तरी, माझी कोणतीच सबब आणि तक्रार नाहीये. मी फक्त अंतिम सामना जिंकल्याबद्दल ऑस्ट्रेलियन संघाला फक्त अभिनंदन द्यायचे आहे. पाचही दिवशी त्यांना आमच्यापेक्षा चांगला खेळ केला. आम्हाला स्वतःकडे लक्ष द्यावे लागणार आहे. काय केल्यानंतर आपण चांगले प्रदर्शन करू आणि कुठे सुधारणा करता येतील, हे तपासून पाहावे लागणार आहे,” असेही द्रविड शेवटी म्हणाला.
दरम्यान उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताला शेवटच्या डावात विजयासाठी 444 धावांचे लक्ष्य मिळाले होते. भारतीय संघ मात्र 234 धावा करून सर्वबाद झाला. तत्पूर्वी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 469, तर भारताने 296 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात 163 धावांची महत्वपूर्ण खेळी करणारा ट्रेविस हेड विजयानंतर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. (Rahul Dravidkar congratulates Australia after India’s loss in WTC final)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING: टेनिसचा ‘युगंधर’ बनला जोकोविच! फ्रेंच ओपनसह 23वे ग्रँडस्लॅम केले नावे
WTC Finalsमध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 भारतीय फलंदाज, 18 महिन्यांनी कमबॅक करणारा रहाणे दिग्गजांवर भारी