नवोदित मंयाक अग्रवालची वेस्ट इंडिजविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. घरगुती क्रिकेटमध्ये केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर त्याला ही संधी मिळाली आहे.
मंयाकने रणजी स्पर्धेत खेळलेल्या आठ सामन्यात तब्बल 105.45 च्या सरासरीने 1160 धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याने 5 शतक ठोकली आहेत. त्याच बरोबर दोन अर्धशतक देखील केली आहेत. या दरम्यान 304 धावांची वैयक्तिक सर्वोच्च खेळी त्याने केली आहे.
कर्नाटकच्या या खेळाडूने फक्त रणजी ट्रॉफीच नाही तर त्याने दक्षिण अफ्रिका अ आणि ऑस्ट्रेलिया अ या संघाविरूद्ध देखील अफलातून कामगिरी केली आहे. त्याने दक्षिण अफ्रिका अ विरूद्ध केलीली 220 धावांची खेळी अविस्मरणीय आहे. त्याने त्याच्या शेवटच्या 13 डावात 6 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
ह्या तरूण खेळाडूवर प्रभाव आहे, भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारत अ सदस्य तो होता.
“कधीही मदत लागली किंवा कोणत्याही प्रकारचा सल्ला कधीही त्यांच्याकडून मिळायचा, धावा करत राहायच्या आणि परत तेच करायचे काय होईल याचा विचार करत बसायचा नाही असे राहुल द्रविड सांगायचे त्याचा फायदा आल्याला झाला,” असे मंयाक हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना म्हणाला.
पुढे बोलताना मंयाक म्हणाला, “मी सामाजिक माध्यंमाचा जास्त वापर करत नाही. मी स्वत:ला बाहेरील हस्तक्षेपासून दूर ठेवत आहे. त्यामुळे आपण आपल्या लक्षावरून विचलित होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे घरगुती क्रिकेट पासुन पुर्ण वेगळे आहे. याची आपल्याला जाणीव असून जे चांगले आहे, ते प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे असे त्याने पुढे बोलताना सांगितले.”
भारतीय संघात सलामीसाठी वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेत केल राहूल, पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल एवढे तीनच पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे मयांकला अंतिम 11 जणांच्या संघात खेळण्याची संधी मिळू शकते.
अशी आहे विंडीज विरुद्ध टीम इंडिया- विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, पृथ्वी शाॅ, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर
महत्वाच्या बातम्या-
-ISL 2018: पहिल्या सुपर संडेला बेंगळुरूची गतविजेत्या चेन्नईयीनवर मात
-ISL 2018: नॉर्थइस्टवर पहिल्या विजयाची लॉबेरा यांना आशा
-“पाकिस्तानला एकही रुपया देणार नाही”- अनुराग ठाकूर