---Advertisement---

राहुल द्रविडच्या मुलाने ठोकला खणखणीत षटकार, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

Samit Dravid
---Advertisement---

बेंगळुरुच्या मैदानावर महाराजा ट्राॅफीतील म्हैसूर वॉरियर्स आणि बेंगळुरू ब्लास्टर्स यांचा सामना खेळला जात होता. या सामन्यात माजी भारतीय खेळाडू आणि प्रशिक्षक राहुल द्रविडचा (Rahul Dravid) मुलगा समित द्रविडनं (Samit Dravid) फलंदाजीदरम्यान एक खणखणीत षटकार ठोकला ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जारदार व्हायरल होत आहे. पण तो त्याच्या खेळीला आणखी उत्कृष्ट बनवू शकला नाही.

खणखणीत षटकार ठोकल्यानंतर समित द्रविड (Samit Dravid) पुढच्याच चेंडूवर बाद झाला. समितनं सात चेंडूत केवळ सात धावा केल्या. त्याच्या खेळीत त्यानं केवळ एक षटकार लगावला. पण त्याच्या बॅटमधून निघालेल्या एका षटकारानी चाहते खूपच प्रभावित झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चागंलाच व्हायरल झाला. पाचव्या षटकात एसयू कार्तिक बाद झाल्यानंतर तो क्रीजवर आला आणि ही कागमिरी केली.

मात्र, करण अहुजाच्या नेतृत्वाखाली म्हैसूर संघाने 18 षटकांत 6 गडी गमावून 182 धावा केल्या. समित लवकर बाद झाल्यानंतरही हर्षिल धर्मानी आणि मनोज भंडागे यांनी संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. बेंगळुरू संघाने 5 चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले आणि शानदार विजय मिळवला.

182 धावांचा पाठलाग करताना बेंगळुरुसाठी सलामीवीर एल आर चेथननं संघाला चांगली सुरुवात करुन दिली. त्याच्या खेळीत त्यानं शानदार (33) धावा केल्या. यष्टीरक्षक सुरज अहुजानं (39) धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत त्यानं 2 चौकारांसह 6 उत्तुंग षटकार ठोकले. भुवन राजूनं बेंगळुरु ब्लास्टारसाठी सर्वाधिक 51 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 212.50 राहिला. त्याच्या खेळीत त्यानं 1 चौकार, 6 उत्तुंग षटकार ठोकले आणि संघाला विजय मिळवून दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

‘ही अशी ट्रॉफी..’, बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकण्यासाठी पॅट कमिन्स आतुर!
आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय, घरात घुसून इंडिजवर गाजवले वर्चस्व
ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्रा ही स्पर्धा गाजवणार, पाहा कधी होणार सामने

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---