मुंबईचे माजी खेळाडू राहुल मंकड यांचे निधन झाले आहे. ६६ वर्षीय राहुल यांचे वडील विनू मंकड (Vinoo Mankad) सुद्धा क्रिकेटपटू होते. तसेच ते भारताचे कर्णधार देखील होते. मंकडिंग हा बाद होण्याचा प्रकार त्याच्या नावावरूनच सुरु झालेला. राहुल काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यामागे पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारासाठी त्यांना लंडनला नेण्यात आलेले. बुधवारी(३० मार्च) त्यांचे लंडनमध्ये निधन झाले.
नॉन स्ट्राइकवर चेंडू टाकण्यापूर्वी केल्या जाणाऱ्या धावबादला मंकडिंग म्हणणे थांबविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. या महिन्याच्या सुरुवातीला एमसीसीने असे बाद करणे कायदेशीर घोषित केले. त्यामुळे इथून पुढे अशा पद्धतीला मंकडींग म्हणता येणार नाही. मुंबईचे खेळाडू शिशिर हट्टगंडी यांनी सोशल मीडियावर राहुल यांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी लिहले की, “जिग्गा भाई, माझ्या मित्रा शांततेत राहा, राहुल मंकड.”
Will miss laughing at life in your absence. Rest In Peace @RMankad #rahulmankad pic.twitter.com/cgIXhvkBpH
— shishir hattangadi (@shishhattangadi) March 30, 2022
Jiga gone far too soon but the memory of you will always be in our hearts. Rest well my friend I miss you #RahulMankad pic.twitter.com/Kp01DVmVrl
— Kiran More (@JockMore) March 30, 2022
Shocked to hear Rahul Mankad passed away Comes from a illustrious cricketing family True gentleman Good cricketer more than that a great human being My heartfelt Condolences to the family May his soul RIP
— TA Sekar (@ta_sekar) March 30, 2022
We are shocked to hear about the passing of Mr Rahul Mankad, former Mumbai cricketer and son of the former Indian captain, Vinoo Mankad.
Condolences to his family and may his soul rest in peace 🙏 pic.twitter.com/G3CQAR1J2G
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) March 30, 2022
राहुल मंकड यांनी ४७ प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये २१११ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ शतकांचा आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांची सर्वोत्कृष्ट धावसंख्या १६२ एवढी आहे. त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ७ विकेट्स देखील घेतल्या आहेत. त्यांची क्रिकेट कारकिर्द १९७२-७३ पासून १९८४ पर्यंत होती. त्यांचे भाऊ अशोक आणि अतुल देखील क्रिकेटपटू आहेत. अशोक यांनी भारतासाठी क्रिकेट खेळले आहे.
अनेकांनी त्यांच्या जाण्याने शोक व्यक्त केला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने देखील त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. भारताचे माजी खेळाडू टीए सेकर यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहले की, ‘राहुल मंकड यांच्या निधनाची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. ते एका शानदार क्रिकेट कुटूंबातील होते. खरे जेंटलमॅन, एका चांगल्या खेळाडू बरोबरच ते चांगले व्यक्तिमत्त्व देखील होते. त्याच्या कुटुंबासाठी माझ्या संवेदना, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.’
महत्त्वाच्या बातम्या-
RCB vs KKR | टॉस जिंकून आरसीबीचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; केकेआरमध्ये मोठा बदल, पाहा प्लेइंग इलेव्हन
VIDEO | खरंच केन विलियम्सन आऊट होता की नाही..? तिसऱ्या पंचांच्या निर्णयामुळे चाहते नाराज
विराटलाही जे जमले नाही ते बाबर आझमने करुन दाखवले! ‘अशी’ कामगिरी करणारा जगातला दूसराच खेळाडू