---Advertisement---

RCB vs KKR | टॉस जिंकून आरसीबीचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; केकेआरमध्ये मोठा बदल, पाहा प्लेइंग इलेव्हन

On: बुधवार, मार्च 30, 2022 7:09 PM
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) २०२२ स्पर्धेतील सहावा सामना आज (बुधवार, दि. ३० मार्च) रोजी नवी मुंबई इथे होत आहे. डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोलकाता संघाने आयपीएल स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाला धोबीपछाड देत हंगामात विजयी सुरुवात केली. त्यामुळे कोलकाता संघ मोठ्या जोशात आरसीबी संघाला भिडणार आहे. तर, पहिल्या सामन्यात पंजाब किंग्ज (पीबीकेएस) संघाकडून सपाटून मार खाल्लेला आरसीबी संघ हंगामातील पहिल्या विजयासाठी झुंजणार आहे.

दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन :

आयपीएलला नुकतीच सुरुवात झाली असून दोन्ही संघ साखळी सामन्यातील केवळ एक-एक सामने खेळले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांनी दुसरा सामना खेळत असताना त्यांच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये काही खास बदल केले नाहीत. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर या दोघांनीही संघात मोठे बदल करण्यास नाही म्हटल्याचे अंतिम प्लेइंग इलेव्हन खेळाडूंच्या यादीवरुन दिसत आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची अंतिम प्लेइंग इलेव्हन :

अनुज रावत, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, दिनेश कार्तिक, शेरफन रुदरफोर्ड, शाहबाझ अहमद, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, आकाशदीप, डेव्हिड विली.

 

कोलकाता नाईट रायडर्स संघाची अंतिम प्लेइंग इलेव्हन :

व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), शेल्डन जॅक्सन, सॅम बिलिंग्स, आंद्रे रसेल, नितिश राणा, सुनील नरीन, उमेश यादव, वरून चक्रवर्ती, टीम साऊदी,

आता पहिल्या विजयासाठी खंबीर होऊन मैदानावर उतरेलेली बेंगलोरची ‘फाफ’सेना आणि हंमागातील विजयी सुर कायम ठेवण्याचे लक्ष्य ठेवलेली ‘श्रेयस’ आर्मी दुसऱ्या सामन्यात कशी खेळणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---