असा एक भारतीय क्रिकेटर आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द वयाच्या 26व्या वर्षी संपली. परंतु तरूण वयातच या दिग्गज खेळाडूची कारकिर्द खराब झाली. हा क्रिकेटपटू एकेकाळी भारतीय संघ पुढचा अनिल कुंबळे (Anil Kumble) मानला जात होता.
भारतासाठी एकदिवसीय, टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा फिरकीपटू राहुल शर्मा (Rahul Sharma) अनेक क्रिकेट चाहत्यांना आठवत असेल, राहुल आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स, पुणे वॉरियर्स, दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals), चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) या संघांचा भाग होता. राहुलने 2010 मध्ये डेक्कन चार्जर्स हैदराबादकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.
राहुल शर्माने (Rahul Sharma) आयपीएल 2011 मध्ये 14 सामन्यांमध्ये 5.46च्या इकॉनॉमी रेटने 16 विकेट्स घेतल्या. त्याच्या घातक गोलंदाजीसमोर फलंदाज गारद झाले होते. राहुलने आपल्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले. राहुलने 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध इंदूरमध्ये वनडे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर 2012 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली.
राहुल शर्माने (Rahul Sharma) भारतासाठी 4 एकदिवसीय, 2 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, परंतु त्यानंतर फ्लॉप शोमुळे त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले. त्याने भारतासाठी 4 एकदिवसीय सामन्यात 6 तर 2 टी20 सामन्यात 3 विकेट्स घेतल्या होत्या. राहुलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 44 सामने खेळले. दरम्यान त्याने 40 विकेट्स घेतल्या.
2012 मध्ये आयपीएल दरम्यान मुंबईच्या जुहू येथे एका रेव्ह पार्टीत पोलिसांनी राहुल शर्माला (Rahul Sharma) पकडले होते. त्यानंतर आयपीएल 2012 मध्ये पुणे वॉरियर्सकडून खेळलेला राहुल शर्माचा सहकारी वेन पार्नेल म्हणाला होता की, “तो ड्रग्सचा व्यसनी नाही आणि चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी वेळ घालवत आहे.” त्यानंतर मुंबई पोलिसांनी जुहू बीचजवळ असलेल्या ओकवूड प्रीमियर हॉटेलवर छापा टाकून दोन्ही खेळाडूंना अटक केली.
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू वेन पारनेलसोबत एका रेव्ह पार्टीत राहुल शर्माला ड्रग्जसह अटक करण्यात आली होती. चाचणी दरम्यान दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. या घोटाळ्यानंतर राहुल शर्माने 2013 मध्ये पुन्हा एकदा आयपीएलमध्ये पुनरागमन केले, परंतु त्याला पुन्हा भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय महिला करणार पाकिस्तानी क्रिकेटपटूशी लग्न, इस्लाम धर्माचाही करणार स्वीकार
सागरिका घाटगेपूर्वी या बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत होता झहीर खान, 8 वर्ष टिकलं होतं नातं
“भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात येणार”, पीसीबी अध्यक्षांचा धक्कादायक दावा!