रिंकू सिंग याने आयपीएलमध्ये 10 एप्रिल रोजी धमाकेदार खेळी करत केकेआरला विजय मिळवून दिला होता. गुजरात टायन्सविरुद्धच्या या सामन्यात शेवटच्या पाच चेंडूवर पाच षटकार रिंकूने मारत सामना जिंकवून दिला होता. यावेळी गोलंदाजी करणाऱ्या यश दयाल याच्यासाठी हे षटक एखाद्या वाईट स्वप्नासारखे ठरले. या घटनेनंतर ड्रेसिंग रूममध्ये काय घडले याचा खुलासा अष्टपैलू राहुल तेवतिया याने केला.
गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (GT vs KKR) संघ रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर समोरासमोर आले होते. हा सामना गुजरात टायटन्स सहज जिंकणार, असे वाटत असतानाच रिंकू सिंग (Rinku Singh) याने आपली ताकद दाखवून दिली. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने विजय शंकर याच्या ताबडतोड अर्धशतकाच्या जोरावर 4 बाद 204 धावा कुटल्या. प्रत्युत्तरत केकेआरने 7 विकेट्सच्या नुकसानावर डावातील शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.
रिंकूने 21 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या. शेवटच्या पाच चेंडूंवर त्याने सलग पाच षटकार ठोकले आणि संघाला आवश्यक असलेल्या 28 धावा काढल्या. दुसरीकडे शेवटच्या षटकात गोलंदाजी करणारा युवा यश दयाल (Yash Dayal) मात्र पूर्णपणे निराश झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर पुढील सामन्यातून त्याला वगळण्यात देखील आले.
त्या संपूर्ण घटनेनंतर ड्रेसिंग रूममध्ये काय घडले याचा खुलासा नुकताच गुजरातचा अष्टपैलू राहुल तेवतिया म्हणाला,
“त्या सामन्यानंतर यशला कोणीही सहानुभूती दाखवली नाही. कारण, ही गोष्ट रोज घडत नाही. त्याला केवळ सराव करत राहण्याचा सल्ला दिला.”
यशने मागील हंगामात गुजरातसठी दमदार कामगिरी केली होती. मात्र, या हंगामात तो अपेक्षित कामगिरी करू शकला नाही.
(Rahul Tewatia Open On Dressing Room Scene On Yash Dayal Conceding Five Sixes)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर आयपीएल फ्रँचायझींची नजर! विश्व क्रिकेटमध्ये होणार मोठी घडामोड
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेपटून लग्नबंधनात, मोठ्या काळापासून रिलेशनमध्ये असलेल्या मैत्रिणीसोबत थाटला संसार