---Advertisement---

सहा महिन्यांपासून पुणेकर राहुल पाजतोय फक्त पाणीच! अजूनही पदार्पणाची प्रतिक्षाच

On: मंगळवार, जानेवारी 3, 2023 11:06 PM
Rahul-Tripathi
---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (03 जानेवारी) मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे पार पडला. भारतीय संघाने अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात 2 धावांनी विजय मिळवत नव्या वर्षाची सुरुवात विजयाने केली. या सामन्यात भारताकडून दोघांनी पदार्पण केले. मात्र, मागील सहा महिन्यांपासून संघाचा सदस्य असलेला राहुल त्रिपाठी याला पुन्हा एकदा बाकावर बसावे लागले.

अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत संघात अनेक‌ युवा खेळाडूंना संधी दिली गेली. पहिल्या सामन्यातही वनडे क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या शुबमन गिल व वेगवान गोलंदाज शिवम मावी यांनी पदार्पण केले. मात्र, मागील सहा महिन्यापासून भारतीय संघासह प्रवास करत असलेला महाराष्ट्राचा अनुभवी फलंदाज राहुल त्रिपाठी याला पुन्हा एकदा डावलण्यात आले.

आयपीएल व देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्यानंतर यावर्षी जून महिन्यात झालेल्या आयर्लंड दौऱ्यावेळी राहुलचा प्रथमच भारतीय संघात समावेश केला गेला. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही तो संघाचा भाग होता.‌ त्यानंतर न्युझीलँड दौऱ्यासाठी त्याला संघातून वगळण्यात आले. मात्र, यावेळी त्याला पुन्हा संघात स्थान दिले गेले. परंतु, सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ संघासोबत राहिल्यानंतरही त्याला अद्याप भारतीय संघाची कॅप मिळालेली नाही.

सध्या 31 वर्षांचा असलेला राहुल आत्तापर्यंत आपल्या कारकिर्दीत 125 टी20 सामने खेळला आहे. यात 2800 पेक्षा जास्त धावा त्याच्या नावे जमा आहेत. आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स, कोलकाता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद या संघांसाठी खेळताना त्याने 76 सामन्यात 1778 धावा कुटल्या आहेत. या धावा 141 च्या धमाकेदार स्ट्राईक रेटने आल्या. त्याला आता सातत्याने डावले जात असल्याने चाहतेही निराश झाले आहेत. मालिकेतील दुसरा सामना त्याचे घरचे मैदान असलेल्या पुणे येथे होणार आहे. या सामन्यात त्याला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

(Rahul Tripathi Again Ignored By Team Management Benched In First T20I Against Srilanka)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ईशानच्या नवीन वर्षाची सुरुवात दिमाखात! श्रीलंकेच्या गोलंदाजांना चोप देत मोडला विस्फोटक सेहवागचा विक्रम
फलंदाजाला गेला नडायला, पण नियम माहिती नसल्याने झम्पाची झाली फजिती; पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---