भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या फलंदाजांनी आक्रमक रूप दाखवत या सामन्यात भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. मात्र, आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या पुणेकर राहुल त्रिपाठीने एक शानदार झेल टिपत आपले पहिले योगदान दिले.
प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर श्रीलंकेचे सलामीवीर कुसल मेंडीस आणि पथुम निसंका यांनी वेगवान फलंदाजी केली. खास करून मेंडीसने आक्रमक रूप दाखवत अर्शदीप सिंग व शिवम मावी यांचा समाचार घेतला. या दोघांनी 8.2 षटकात 80 धावांची सलामी दिली. चहलने भारताला पहिले यश मिळवून दिले.
???????????????????????????????? ????????????????????????????????! ???? ????
DO NOT MISS this sensational catch from @tripathirahul52 ???? ???? #TeamIndia | #INDvSL https://t.co/XFKAT1X3Sk
— BCCI (@BCCI) January 5, 2023
त्यानंतर राजपक्षे लगेच बाद झाला. 12 वे षटक टाकण्यासाठी अक्षर पटेल याला पाचारण करण्यात आले. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर निसंका याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीमारेषेवर तैनात असलेल्या राहुल त्रिपाठी याने अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर करत झेल टिपला. मिड विकेटवरून धावत येत त्याने लॉंग ऑनला हा झेल पूर्ण केला.
भारतीय गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केले. मात्र, श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाकाने त्यानंतर भारतीय गोलंदाजांवर प्रति आक्रमण केले. त्याने सर्वच गोलंदाजांना फोडून काढत 20 षटकात अर्धशतक साजरे केले. अखेरपर्यंत नाबाद राहत त्याने 22 चेंडूवर 54 धावा केल्या. यासह श्रीलंकेने भारतासमोर 207 धावांचे आव्हान ठेवले.
(Rahul Tripathi Took Stunning Catch In Pune T20I Against Srilanka)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकीकडे शिवम मावीने गाजवलं मुंबाईचं वानखडे स्टेडियम अन् दुसरीकडे घरी कुटुंबीय…
टीम इंडियाच्या ‘या’ दोन दिग्गजांना आयडल मानतो जितेश; म्हणाला, “त्यांनी मला…”