---Advertisement---

युवा कबड्डी सिरीज मधून रायगड व बीड संघ एलिमिनेट

---Advertisement---

पुणे – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये आजपासून प्ले-ऑफसच्या सामान्यांना आजपासून सुरुवात झाली. क्वालिफायर 1 व 2 हे सामने नंदुरबार व पालघर या संघानी अनुक्रमे जिंकत क्वालिफायर 3 व 4 साठी पात्र झालेत. तर आज झालेल्या एलिमिनेटर 1 व 2 मध्ये रायगड व बीड संघ एलिमिट झाले तर मुंबई शहर व नाशिक संघ पुढील एलिमिनेटर सामन्यासाठी पात्र ठरले.

आज सकाळी झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात नंदुरबार संघाने सांगली संघावर 41-36 असा विजय मिळवला. नंदुरबार कडून वरून खंडले ने अष्टपैलू खेळ करत 13 गुण मिळवले. तर जयेश महाजन सुद्धा अष्टपैलू खेळ करत 10 गुण मिळवले. संचित शिंदे ने एक सुपर रेड करत सामन्याला कलाटणी दिली होती. तर दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात रत्नागिरी संघाकडून पालघरच्या प्रतिक जाधव ने विजय हिसकावून घेतला. पालघर संघाने अखेरच्या क्षणाला 29-27 अशी बाजी मारली. पालघर कडून प्रतिक जाधव ने चढाईत 10 गुण मिळवले तर प्रेम मंडळ ने पकडीत 6 गुण मिळवले.

आज दुपारी झालेल्या पहिल्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई शहरच्या राज आचार्य ने एकाकी झुंज देत रायगड संघाला अखेरच्या मिनिटाला पिछाडीवर टाकले. मुंबई शहर ने 35-30 असा विजय मिळवत पुढील एलिमिनेटर सामन्यासाठी आपली जागा पक्की केली. राज आचार्य ने संपूर्ण सामन्यात 20 गुण मिळवले. तर आज झालेल्या दुसऱ्या एलिमिनेटर सामन्यात नाशिक संघाने अखेरच्या क्षणी पलटवार करत 32-31 असा बीड संघावर विजय मिळवला. नाशिक कडून पवन भोर ने चढाईत 10 गुण तर ईश्वर पथाडे ने पकडीत 5 गुण मिळवत महत्वपूर्ण भूमिका बजावली.

उद्या होणारे सामने:-
क्वालिफायर 3 – अहमदनगर विरुद्ध नंदुरबार
क्वालिफायर 4 – कोल्हापूर विरुद्ध पालघर
एलिमिनेटर 3 – सांगली विरुद्ध मुंबई शहर
एलिमिनेटर 4 – रत्नागिरी विरुद्ध नाशिक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---