---Advertisement---

MPL 2025: पाऊस पडला रायगडच्या पथ्यावर! इतिहासात पहिल्यांदाच रॉयल्स प्ले ऑफ्समध्ये

On: बुधवार, जून 18, 2025 6:05 PM
---Advertisement---

एमपीएल 2025 मध्ये बुधवारी (18 जून) दुपारच्या सत्रात रायगड रॉयल्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स असा सामना खेळला गेला. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. मात्र, या सामन्यातील एका गुणामुळे रायगड रॉयल्सने प्ले ऑफ्समधील आपली जागा पक्की केली. स्पर्धेच्या इतिहासात ते पहिल्यांदाच प्ले ऑफ्समध्ये खेळताना दिसतील.

पावसाच्या व्यत्ययात सुरू झालेला हा सामना प्रत्येकी 18 षटकांचा करण्यात आला होता. सलामीला बढती मिळालेल्या विकी ओस्तवाल याने 9 चेंडू 13 धावा करत संघाला सुरुवात दिली. यानंतर ऋग्वेद मोरे केवळ सहा धावा काढून बाद झाला. अनुभवी सिद्धेश वीर याने पुन्हा एकदा आपल्या संघासाठी महत्त्वाची कामगिरी करताना 22 चेंडूंमध्ये 29 धावा केल्या. मधल्या फळीत हर्ष संघवी याने 21, ओंकार खाटपे याने 11 व‌ नीरज जोशी याने 16 धावा करून संघाला 100 पार नेले. डावातील चौदाव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर कर्णधार ऋषभ राठोड सहा धावा काढून बाद झाल्यावर, पावसाने हजेरी लावली. त्यावेळी संघाचा धावफलक 14 षटकांत 6 बाद 111 असा होता.

यानंतर पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही. आयोजकांनी हा सामना देखील रद्द करण्यात येत असल्याचे म्हटले. त्यामुळे सामन्यात काहीशा मागे पडलेल्या रायगड रॉयल्सला महत्त्वाचा एक गुण मिळाला. यासह त्यांचे 9 सामन्यात 10 गुण झाले.‌ तसेच, प्ले ऑफ्समधील त्यांची जागा देखील निश्चित झाली. गुणतालिकेत रायगडच्या खाली असलेल्या पीबीजी कोल्हापूर टस्कर्स या एकाच संघाला आता त्यांच्यापेक्षा अधिक गुण मिळवता येऊ शकतात. तर, रत्नागिरी जेट्स व सातारा वॉरियर्स 10 गुणांपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. याच कारणाने ईगल नाशिक टायटन्स व‌ पुणेरी बाप्पा यांच्यानंतर एमपीएल 2025 च्या प्ले ऑफ्समध्ये दाखल होणारा तिसरा संघ होण्याचा मान त्यांनी मिळवला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---