---Advertisement---

MPL 2025: रायगड रॉयल्सचा विजयरथ क्वालिफायर 2 मध्ये, कोल्हापूरचे स्वप्न तिसऱ्या वर्षीही ध्वस्त

On: शनिवार, जून 21, 2025 11:37 AM
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 च्या एलिमिनेटरचा सामना 20 जून रोजी खेळला गेला. गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या रायगड रॉयल्स व पीबीजी कोल्हापूर टस्कर्स यांच्या दरम्यान हा सामना झाला. रायगड रॉयल्सने या अत्यंत महत्त्वाचा सामन्यात खेळ उंचावून विजय संपादन केला. यासह त्यांनी क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश मिळवला. शानदार अष्टपैलू खेळ दाखवणारा विकी ओस्तवाल सामन्याचा मानकरी ठरला.

गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाला रायगडने प्रथम फलंदाजांसाठी आमंत्रित केले. कोल्हापूरचे सलामीवीर अंकित बावणे व सचिन धस यांनी पाच षटकात 38 धावा करत चांगली सुरुवात केली. सचिन 23 धावा करून बाद झाला. त्यानंतर विशांत मोरे केवळ दोन धावा करू शकला. तिसऱ्या गड्यासाठी अंकित व सिद्धार्थ म्हात्रे यांच्या दरम्यान 44 चेंडूंमध्ये 44 धावांची संथ भागीदारी झाली. अंकितने 50 चेंडूंमध्ये 57 धावा केल्या. कर्णधार राहुल त्रिपाठी देखील फक्त दोन धावा शकला. सिद्धार्थने 29 चेंडू मध्ये 31 धावा केल्या‌. श्रीकांत मुंडे 12 व धनराज शिंदे पाच धावांच्या पुढे जाऊ शकले नाहीत. आनंद ठेंगे याने केवळ सहा चेंडूंमध्ये 26 धावा करत, संघाला 164 पर्यंत पोहोचवले. रायगडसाठी निखिल कदम याने सर्वाधिक तीन बळी मिळवले.

रायगड रॉयल्स ला विजयासाठी मिळालेल्या 165 धावा बनवून देण्यासाठी विकी ओस्तवाल व सिद्धेश वीर यांनी मैदानात पाऊल ठेवले. दोघांनी कोल्हापूरच्या गोलंदाजांना कोणतीही संधी न देता धावा काढल्या. केवळ ‌8.4 षटकात 76 धावा करून त्यांनी विजयाची पायाभरणी केली. सिद्धेश 24 चेंडूंमध्ये 39 धावा करून बाद झाला. त्यानंतर विकी व नीरज जोशी यांनी 44 चेंडूंमध्ये 63 धावांची आणखी एक भागीदारी केली. त्यामुळे रायगड संघ विजयाच्या जवळ पोहोचला. अखेरच्या टप्प्यात रायगडचे तीन बळी गेले. मात्र, नीरज (नाबाद 387) याने संयम राखत संघाला विजयी केले. कोल्हापूरसाठी आनंद ठेंगेने दोन बळी मिळवले.

रायगड रॉयल्स आता क्वालिफायर 2 मध्ये पुणेरी बाप्पा संघाविरुद्ध भिडतील. शनिवारी सायंकाळी सात वाजता हा सामना खेळला जाईल. या सामन्यात विजेता होणारा संघ अंतिम फेरीत ईगल नाशिक टायटन्सविरूद्ध विजेतेपदासाठी खेळेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---