---Advertisement---

IPL Final: RCB vs PBKS सामन्यावर पावसाचे सावट? जाणून घ्या अहमदाबादमध्ये सामन्यावेळी कसं असेल हवामान

On: मंगळवार, जून 3, 2025 4:22 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (indian premier league 2025 final) स्पर्धेचा अंतिम सामना मंगळवार (3 जून) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्स संघामध्ये खेळला जाणार आहे. (ahmadabad narendra modi stadium RCB vs PBKS) यावेळी आयपीएल स्पर्धेला एक नवा विजेता संघ मिळणार आहे. दोन्ही संघ मैदानात जिंकण्याच्या तयारीने उतरतील .आरसीबी आणि पंजाब 2008 पासूनच या स्पर्धेचा भाग आहेत, तसेच दोन्ही संघांनी आजपर्यंत एकही ट्रॉफी जिंकलेली नाही. दोन्ही संघ ट्रॉफी उचलण्याच्या खूप जवळ पोहोचल्या होत्या, पण त्या ट्रॉफी उचलू शकल्या नाहीत. आरसीबी ( RCB) याआधी 2009, 2011, 2016 मध्ये आयपीएल अंतिम सामन्यात पोहोचली आहे. तसेच पंजाब 2014 मध्ये आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. त्यामुळे आज दोन्ही संघांनाही त्यांच्या पहिल्या ट्रॉफीची आतुरतेने प्रतीक्षा असेल.

पण हवामानाच्या कारणाने चाहत्यांच्या मनात शंका आहे की सामन्यादरम्यान पावसाचे सावट आहे. एक्यूवेदर हवामान खात्यानुसार अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामन्याच्या सुरुवातीला तापमान 36 डिग्री सेल्सिअस आसपास राहण्याची शक्यता आहे. जे शेवटपर्यंत 31 डिग्री सेल्सिअस वर येईल. आकाशात जास्त वेळ ढग दाटून येण्याची संभावना आहे, त्यामुळे सामन्यादरम्यान पाऊस येण्याची थोडी शक्यता आहे.

जर आज कदाचित जास्त पाऊस आला आणि सामना रद्द करावा लागला तर आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी बुधवार हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. परंतु पाऊस होण्याची शक्यता कमी असल्याकारणाने हा सामना होऊ शकतो. तसेच जर तरीसुद्धा पावसाने अडचण निर्माण केलीच तर लीग स्टेज मध्ये सर्वात जास्त पॉईंट असणारा संघ या हंगामाची ट्रॉफी जिंकेल म्हणजेच पंजाब किंग्स.

अहमदाबादने 2023 मध्ये आयपीएल फायनल सामन्याचे यजमान पद भूषवले होते. त्यावेळी देखील पावसाने खूप खोडा घातला. याआधी 28 मे रोजी झालेला सामना सुद्धा एक चेंडू फेकण्याआधीच स्थगित करावा लागला. सुदैवाने भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने उद्यासाठी फायनल राखीव दिवस ठेवण्याचा उपयोग केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---