---Advertisement---

धर्मशाळा स्टेडियममधील खेळपट्टी कशी असेल? पावसाच्या पार्श्वभूमीवर टॉस ठरणार महत्त्वाचा

On: रविवार, मे 4, 2025 1:36 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेतील 54 वा सामना पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघांमध्ये खेळला जाणार आह. हा सामना जगातील सर्वात सुंदर स्टेडियम म्हणजेच हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत समोरासमोर असतील. जे दिल्ली कॅपिटल्समध्ये सोबत खेळलेले आहेत. जाणून घ्या धर्मशाला स्टेडियमची खेळपट्टी रिपोर्ट आणि हवामान कसे राहील.

पंजाब किंग्स संघाने आतापर्यंत चांगले प्रदर्शन केले आहे. संघाची मुख्य ताकद म्हणजे, त्यांचे टॉप तीन फलंदाज आहेत. प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यर चांगल्या खेळीमध्ये दिसले आहेत. गोलंदाजांमध्ये अर्शदीप सिंग आणि युजवेंद्र चहल चांगल्या लयीत खेळत आहेत. तसेच मागचे सलग दोन सामने पराभूत झाल्यानंतर लखनऊ संघ दबावात आहे. तसेच कर्णधार रिषभ पंत कडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे.

धर्मशाला क्रिकेट स्टेडियम खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना स्विंग मिळू शकते. तसेच फलंदाजांसाठी आव्हान ठरू शकते. बाउंड्री छोटी असल्याने मोठे शॉट्स मारताना त्रास होणार नाही. नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराला पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घ्यायला हवा. पावसाच्या संभावनेने हा निर्णय योग्य ठरेल.

पंजाब किंग्स विरुद्ध लखनऊ सामन्यात पावसाची संभाव्यता मानली जात आहे. तसेच हवामान रिपोर्टनुसार 6 वाजता पावसाची शक्‍यता आहे.

धर्मशाळाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये एकूण 13 आयपीएल सामने खेळले गेले आहेत. यामध्ये 8 वेळा प्रथम फलंदाजी करणारा संघ तसेच 5 वेळा प्रथम गोलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. या मैदानावर सर्वात मोठी धावसंख्या 241 धावांची आहे, जी आरसीबीने पंजाब किंग्स विरुद्ध 2024 मध्ये केली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---