यावर्षीचा वनडे विश्वचषक भारतात आयोजित केला गेला आहे. 5 सप्टेंबर रोजी सुरू होणारी क्रिकेटची ही सर्वात मोठी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बीसीसीआय सर्व प्रयत्न करत आहे. मंगळवारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने विश्वचषक ट्रॉफीची भव्य मिरवणूक पुणे शहरात काठली. यावेळी क्रिकेटप्रेमींनी भर पावसात डान्स केल्याचा व्हिडिओ सध्या समोर येत आहे.
भारतीय क्रिकेट नियमक मंडळ (BCCI) म्हणजेच बीसीसीआय मागच्या काही महिन्यांपासून वनडे विश्वचषकाच्या तयारीत आहे. विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याआधी आयसीसीची खास विश्वचषक ट्रॉफी जगभरातील अनेक देशांमध्ये प्रवास करून आली आहे. सध्या भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये विश्वचषक ट्रॉफी फिरवली जात आहे. मंगळवारी ट्रॉफी पुण्यात होती, ज्यासाठी महाराष्ट्रीय क्रिकेट असोसिएशनकडून खास मिरवणूक आयोजित केली गेली. चाहते मोठ्या संघेत या मिरवणूकीसाठी रस्त्यावर उतरले होते. मिरवणूकीदरम्यान पावसाने हजेरी लावल्यामुळे पुण्यातील फरग्यूसन महाविद्यालय मार्गावर (FC Road) युवा वर्गाने डान्सचा आनंद घेतला. याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
World Cup Trophy tour in Pune.
Rohit Sharma fans with their idol’s posters & big banners during the event – The craze is huge. pic.twitter.com/phkSJI7sL6
— Johns. (@CricCrazyJohns) September 26, 2023
दरम्यान, विश्वचषक ट्रॉफीच्या मिरवणुकीचा मार्ग सेनापटी बापट रोडचे जे डब्लू मॅरिएट हॉटेल, बारभारती चौक, बीएमसीसी कॉलेज, एमएससीसी कॉलेज, फरग्यूसन माहविद्याल ते शिवाजीनगरचे कृषी महाविद्यालय असा होता. दुपारी 1 वाजता ही मुरवणूक सुरू झाली होती. यावेळी एमसीए अध्यक्ष आणि विधानसभा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) ट्रॉफीसोबत संपूर्ण मिरवणुकीमध्ये उपस्थित राहिले.
दरम्यान, विश्वचषक 2023 हंगामाचील सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये होईल. विश्वचषकाचा अंतिम सामना देखील अहमदाबादमध्येच 19 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर विश्वचषकाचे एकूण पाच सामने यावर्षी आयोजित केले गेले आहेत. भारतीय संघ एमसीएस स्टेडियवर 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध खेळेल. चाहत्यांमध्ये या सामन्यासाठी विशेष उत्सुकता पाहायला मिळत आहे. (Rain on FC Road in Pune during the World Cup Trophy Rally)
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकप काऊंटडाऊन: विश्वचषक इतिहासात ‘अशी’ बॉलिंग फिगर टाकायची डेरिंग त्याच्याशिवाय कुणीच केली नाही, वाचाच
वर्ल्डकप स्पेशल: World Cupमध्ये सर्वाधिक धावा करणारे Top 10 कर्णधार; यादीत फक्त दोनच भारतीय