नॉटिंघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंट ब्रिजवर ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात आला होता. या सामन्याच्या अखेरच्या दिवशी (८ ऑगस्ट) पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ न झाल्याने हा सामना अनिर्णित घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा पाऊस भारतासाठी खलनायक ठरल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
गेल्या दोन वर्षांत इंग्लंडमध्ये झालेल्या पावसाने भारताला खूप नुकसान झाले आहे. भारतीय संघाला पावसामुळे इंग्लंडमध्ये झालेल्या २ महत्त्वाच्या सामन्यात मोठा फटका बसला आहे. इंग्लंडमध्येच आयोजित करण्यात आलेल्या २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकातील भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात देखील पावसाने खोडा घातला होता. ज्यामुळे हा सामना राखीव दिवशी पूर्ण झाला होता. तसेच हा सामना भारताने गमवला देखील होती.
हा सामना ९ जुलै २०१९ रोजी सुरू झालेला, पण पावसामुळे १० जुलै २०२१ रोजी संपला. या सामन्यात भारत २४० धावांचे लक्ष्य देखील साध्य करू शकला नाही.
तसेच जून २०२१ मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील पावसाने बराच व्यत्यय आला. या अंतिम सामन्यात देखील भारत आणि न्यूझीलंड संघ आमने-सामने होते. साउथम्प्टनमध्ये झालेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे धुऊन गेला. दुसऱ्या दिवशी फक्त ६४.४ षटके खेळली गेली आणि विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे उत्कृष्ट फलंदाजी करून पॅव्हेलियनमध्ये परतले होते.
पण सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वातावरणात थोडसे बदल झाला. भारताने नियमित अंतराने आपली विकेट गमावली आणि पहिल्या डावात २१७ धावांचा झाला. यानंतर चौथा दिवसही पावसामुळे वाहून गेला. न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात २४९ धावा केल्या आणि दुसऱ्या डावात भारतीय संघाला फक्त १७० धावां करता आल्या. सामना पावसामुळे सहाव्या दिवशी म्हणजे राखीव दिवशी घेण्यात आला. अखेरच्या दिवशी न्यूझीलंड संघाने सामना जिंकत पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
महत्त्वाच्या बातम्या –
‘पाऊस बनला खलनायक’, इंग्लंड-भारत कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर चाहते संतापले; दिल्या अशा प्रतिक्रिया
‘मोहम्मद सिराज आता भारताचा दुसऱ्या पसंतीचा गोलंदाज ठरत आहे’, ऑसी दिग्गजाने केले कौतुक
विमानात एअर होस्टेसने सुरेश रैनाला म्हटले होते ‘मास्टर ब्लास्टर’चा मुलगा; सचिननेही घेतली होती मजा