---Advertisement---

क्रिकेटच्या मैदानात रैना, गेल आणि सेहवाग परतणार, दिसणार आयव्हीपीएलमध्ये; थेट सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा

On: गुरूवार, फेब्रुवारी 22, 2024 11:56 AM
---Advertisement---

इंडियन वेटरन प्रीमियर लीग (IVPL) चा पहिला सिझन ग्रेटर नोएडा येथे २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तर या लिगमध्ये वीरेंद्र सेहवाग, सुरेश रैना, ख्रिस गेल, प्रवीण कुमार, हर्शल गिब्स, रजत भाटिया सारखे स्टार्स IVPLमध्ये मैदानात उतरणार आहेत. याबाबत बोर्ड फॉर वेटरन क्रिकेट इन इंडिया ने ही माहिती दिली आहे. याबरोबरच हे सामने बीव्हीसीआय आयोजित IVPL सामने शहीद विजयसिंह पथिक क्रीडा संकुलातील क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहेत. याबाबत बीव्हीसीआयने रविवारी ही घोषणा केली आहे. 

याबरोबरच या लीगमध्ये तुम्हाला सेहवागची धमाकेदार फलंदाजी, रैनाचे क्षेत्ररक्षण आणि ख्रिस गेलचे दमदार षटकार पाहायला मिळणार आहेत. तसेच या बलाढ्य खेळाडूंच्या उपस्थितीने लीग स्टार पॉवर तर दिलीच पण त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनाही उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे या लीगमध्ये क्रिकेटच्या दिग्गजांसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या युवा प्रतिभेलाही ओळख मिळणार आहे.

https://twitter.com/ivplt20/status/1760262274046943415

अशातच या लीगचे सर्व सामने ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय सिंह पथिक क्रीडा संकुलात खेळवले जातील. तर या लीगचे आयोजन 23 फेब्रुवारी 2024 ते 3 मार्च 2024 या कालावधीत करण्यात येणार आहे. तसेच आयव्हीपीएलमध्ये एकूण सहा संघांमध्ये चुरशीची स्पर्धा देखील होणार आहे. यामध्ये व्हीव्हीआयपी उत्तर प्रदेश, राजस्थान लिजेंड्स, रेड कार्पेट दिल्ली, छत्तीसगड वॉरियर्स, तेलंगणा टायगर्स आणि मुंबई चॅम्पियन्स हे संघ सहभागी आहेत.

https://twitter.com/ivplt20/status/1760272843726561716

या लीगमध्ये वीरेंद्र सेहवाग मुंबई चॅम्पियन्सचा कर्णधार आहे तर ख्रिस गेल तेलंगणा टायगर्सचा कर्णधार असेल. व्हीव्हीआयपी उत्तर प्रदेशची कमान सुरेश रैनाच्या हाती असेल. तसेच हर्शल गिब्स दिल्लीच्या रेड कार्पेट संघाचे नेतृत्व करणार आहे. या लीगबद्दल दिग्गज खेळाडूंनाही उत्सुकता असून त्यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. BVCI चे कार्यवाहक अध्यक्ष आणि IVPL चे अध्यक्ष श्री प्रवीण त्यागी म्हणाले, “माजी दिग्गज आपल्या उर्जेने भारतातील अनुभवी क्रिकेटला पुढे चालना देतील. तसेच आम्ही सर्व दिग्गज खेळाडूंचे IVPL कुटुंबात स्वागत करतो. प्रत्येकजण त्याची जादू पाहण्यासाठी तयार आहे. ”

https://twitter.com/ivplt20/status/1760271414190317786

दरम्यान, आयव्हीपीएलचा पहिला सामना शहीद विजय सिंग क्रीडा संकुलात सेहवागच्या मुंबई चॅम्पियन्स आणि ख्रिस गेलच्या तेलंगणा टायगर्समध्ये होणार आहे. तसेच अंतिम सामना ३ मार्च रोजी होणार आहे. उपांत्य फेरीपूर्वी या स्पर्धेच्या साखळी टप्प्यात सर्व संघ 5-5 सामने खेळतील. तर 2 मार्च रोजी उपांत्य फेरीचा सामना होईल ज्यामध्ये चार संघ प्रवेश करतील. युरोस्पोर्ट, डीडी स्पोर्ट्स आणि फॅनकोडवर या सामन्यांचे भारतात प्रसारण केले जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---