माजी भारतीय क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्जचा ‘मिस्टर आयपीएल’ नावाने ओळखला जाणारा प्रमुख खेळाडू सुरेश रैना आयपीएलच्या पुढील हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडूनच खेळू शकतो, असे सीएसकेच्या एका पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. तब्बल १० आयपीएल हंगाम चेन्नईसाठी खेळल्यानंतर रैनाने २०२० आयपीएलमधून माघार घेतली होती. त्यावेळी, रैना व सीएसके संघ व्यवस्थापनाचे संबंध बिघडल्याचे बोलले जात होते. मात्र, नुकतेच सीएसकेच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्याने केलेल्या वक्तव्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सीएसके पदाधिकाऱ्याने केला खुलासा
मंगळवारी (२२ डिसेंबर) रैनाला मुंबई येथे अटक करण्यात आली होती. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर कारवाई केली गेलेली. मात्र, काही वेळातच त्याला जामीन मिळाला. याबाबतीत, चेन्नई सुपर किंग्जच्या पदाधिकाऱ्याला विचारले असता, तो म्हणाला, ‘आम्ही त्याविषयी ऐकले आहे. रैनाविषयी आमच्या काही योजना आहेत. तो पुढील वेळी आमच्या सोबत असेल. त्याच्यापासून वेगळे होण्याचा आमचा कोणताही मानस नाही.’
रैनाने घेतली होती आयपीएलमधून माघार
रैना आयपीएल २०२० ला मूकला होता. रैना चेन्नई सुपर किंग्जसोबत युएई येथे गेला होता. मात्र, संघ व्यवस्थापनाशी वाद झाल्याने तो मायदेशी परतलेला, अशी बातमी आली होती. त्यानंतर, सीएसकेने आपल्या संकेतस्थळावरून रैनाचे नाव हटवले होते.
रैनाने आयपीएलमध्ये आतापर्यंत १९३ सामने खेळताना ३३.३४ च्या सरासरीने ५३६८ धावा फटकावल्या आहेत. चेन्नईने मिळवलेल्या तीनही आयपीएल विजेतेपदांमध्ये त्याचा मोठा वाटा होता.
महत्त्वाच्या बातम्या-
माजी भारतीय दिग्गजाने निवडला भारत- ऑस्ट्रेलियाचा संयुक्त कसोटी संघ; विराटला दिला डच्चू
‘या’ सामन्यात माजी कर्णधार सौरव गांगुली पुन्हा एकदा दिसणार मैदानात चौकार- षटकार ठोकताना