सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली अर्बनायझर्स हैदराबाद संघ लेजेंड्स लीग क्रिकेट 2023 च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. सुरतमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात अर्बनायझर्स हैदराबादने मोहम्मद कैफ याच्या नेतृत्वाखाली मणिपाल टायगर्सचा पराभव केला. प्रथम खेळताना अर्बनायझर्स हैदराबादने 20 षटकांत 6 विकेट्स गमावून 253 धावा केल्या. प्रत्युत्तरात मणिपाल टायगर्स संघ 178 धावा करून सर्वबाद झाला. ड्वेन स्मिथ याला त्याच्या उत्कृष्ट शतकासाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
मणिपाल टायगर्सचा कर्णधार मोहम्मद कैफ याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जो पूर्णपणे चुकीचा ठरला. अर्बनायझर्स हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही पण ड्वेन स्मिथ याने एकहाती डाव पुढे नेला. सलामीवीर मार्टिन गप्टिल अवघी 1 धावा करून बाद झाला. रिकी क्लार्क याने 19 चेंडूत 34 धावा केल्या. कर्णधार सुरेश रैना (Suresh Raina) यालाही केवळ 2 धावा करता आल्या.
ड्वेन स्मिथ (Dwayne Smith) क्रीजवर राहिला आणि त्याने शानदार खेळी खेळली. स्मिथने 53 चेंडूत 14 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 120 धावांची शानदार खेळी केली. खालच्या फळीत गुरकीरत सिंग याने 26 चेंडूत 39 धावा आणि असगर अफगाण याने 8 चेंडूत नाबाद 23 धावा करत संघाला 253 धावांपर्यंत नेले.
लक्ष्याचा पाठलाग करताना मणिपाल टायगर्स संघाने झटपट धावा करण्याच्या प्रयत्नात विकेट्स गमावल्या. 100 धावांपूर्वीच संघाने 5 विकेट्स गमावल्या आणि टॉप ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप ठरली. खालच्या फळीत अँजेलो परेरा (Angelo Perera) याने 30 चेंडूंत 7 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 73 धावांची खेळी केली पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. या कारणामुळे संघाला केवळ 178 धावा करता आल्या. अर्बनायझर्स हैदराबादकडून जेरोम टेलर (Jerome Taylor) आणि पीटर ट्रेगो (Peter Trego) यांनी 3-3 विकेट्स घेतल्या. (Raina’s team defeats Kaif’s team to reach the final, the opening batsman scores a brilliant century)
महत्वाच्या बातम्या
ब्रायन लाराची मोठी भविष्यवाणी; म्हणाला, ‘हा’ भारतीय युवा खेळाडू माझा 400 धावांचा विक्रम मोडेल
भारतीय गोलंदाजाने बांधली लग्नगाठ, खास कॅप्शनसह पत्नीसोबतचे फोटो केले शेअर