पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक 2018 निमंत्रित 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीच्या लढतीत डेक्कन जिमखाना व क्लब ऑफ महाराष्ट्र, तर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी व एमसीए 1 यांच्यातील सामने हे पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहिले व त्यामुळे या चारही संघांना प्रत्येकी 1गुण देण्यात आला.
डेक्कन जिमखाना व पूना क्लब येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीच्या लढतीत पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना डेक्कन जिमखाना संघ18.3षटकात 115धावावर संपुष्टात आला. यामध्ये अभिषेक ताटे 29, अथर्व चिप्पा 24, प्रखर अगरवाल 18, श्लोक धर्माधिकारी 5, यशोधन शुक्ला 6 यांनी संघाच्या डावाला आकार दिला.
क्लब ऑफ महाराष्ट्रकडून वरूण सोनटक्के(3-19), राजवर्धन उंडरे(3-15), कन्हैय्या लड्डा(2-15)यांनी सुरेख गोलंदाजी केली. डेक्कन जिमखाना संघाचा डाव115धावांवर संपुष्टात आल्यानंतर पाऊस सुरु झाला व अनिर्णित अवस्थेत सामना संपला. त्यामुळे पंचांनी दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देऊन समाधान करण्यात आले.
दुसऱ्या सामन्यात यश जगदाळे 41(38), अद्वैत मुळे 30(30), सौरभ नवले 22 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 20षटकात 7बाद 121धावा केल्या. एमसीए 1कडून प्रथमेश बजारी 2-11, अनिकेत इंद्रजीत 2-13 यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
121धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला एमसीए 1 संघ 8षटकात 1बाद 41धावा अशा सुस्थितीत असताना पाऊस सुरु झाला. पावसामुळे दुसरा डाव होऊ न शकल्यामुळे सामना अनिर्णित राहिला व त्यामुळे पंचांनी दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देऊन समाधान करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
डेक्कन जिमखाना: 18.3षटकात सर्वबाद 115धावा(अभिषेक ताटे 29(34), अथर्व चिप्पा 24(15), प्रखर अगरवाल 18(19), श्लोक धर्माधिकारी 5, यशोधन शुक्ला 6, वरूण सोनटक्के 3-19, राजवर्धन उंडरे 3-15, कन्हैय्या लड्डा 2-15) वि.क्लब ऑफ महाराष्ट्र: पावसामुळे सामना अनिर्णित;
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 20षटकात 7बाद 121धावा(यश जगदाळे 41(38), अद्वैत मुळे 30(30), सौरभ नवले 22(20), प्रथमेश बजारी 2-11, अनिकेत इंद्रजीत 2-13, इस्माईल तांबे 1-17, ज्ञानेश्वर शिंदे 1-34)वि.एमसीए 1: 8षटकात 1बाद 41धावा(ओंकार गावडे 14(8), रणजीत निकम नाबाद 11(17), हर्षवर्धन पाटील 2-7); पावसामुळे सामना अनिर्णित;