मार्च महिन्यात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ चा हंगाम सुरू होणार आहे. तत्पूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी आयपीएलचा मेगा लिलाव पार पडला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात जायंट्स या २ नव्या संघांसह जुने ८ संघ सहभागी झाले होते. त्यामुळे बऱ्याचशा खेळाडूंना आपल्या ताफ्यात सहभागी करण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या लिलावाच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या १९ वर्षांखालील विश्वचषक संघाचा स्टार खेळाडू राज बावा याला लाखोंमध्ये पैसे मोजत फ्रँचायझींनी विकत घेतले आहे.
Raj Angad Bawa is SOLD to @PunjabKingsIPL for INR 2 crore 👏👏 #TATAIPLAuction @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) February 13, 2022
१९ वर्षांखालील विश्वचषकात आपल्या अष्टपैलू प्रदर्शनाचा ठसा उमटवणाऱ्या बावाला विकत घेण्यासाठी ३ फ्रँचायझींमध्ये स्पर्धा पाहायला मिळाली. आयपीएलची सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने त्याच्यावर सर्वात आधी बोली लावली. त्यानंतर शर्यतीत सनरायझर्स हैदराबाद उतरले. मात्र पंजाब किंग्जने बाजी मारत अखेर त्याला २ कोटींच्या किंमतीला विकत घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘उस्मानाबाद एक्सप्रेस’ राजवर्धन हंगारगेकर बनला चेन्नईचा ‘सुपरकिंग’
बावाची IPL लिलावात हवा! वर्ल्डकपमधील कामगिरीने वाढला भाव, पंजाबने मोजले तब्बल ‘इतके’ कोटी
‘वर्ल्ड चॅम्पियन’ कर्णधार झाला लखपती; ‘या’ संघात मिळाले स्थान