आगामी 2025च्या आयपीएल (Indian premier League) हंगामाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या आयपीएल हंगामापूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्यासाठी भारतीय नियामक मंडळाने (BCCI) काही नव्या नियमांची यादी जाहीर केली आहे. त्या नियमानुसार एका संघाला जास्तीत जास्त 5 खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी मिळाली आहे, तर एका राईट टू मॅचचा (RTM) वापर केला जाणार आहे. तत्पूर्वी राजस्थान रॉयल्स अनेक मोठ्या खेळाडूंना सोडू शकते, असे मानले जात आहे. या बातमीद्वारे आपण या 3 खेळाडूंबद्दल जाणून घेऊया, ज्यांना राजस्थान संघ सोडू शकतो.
युझवेंद्र चहल- आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांमध्ये युझवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) नावाचा समावेश होतो. राजस्थानने चहलला 6.5 कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात सामील केले होते. त्याआधी चहल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB) खेळत होता. शेवटच्या आयपीएल हंगामात चहलने 18 विकेट्स घेतल्या होत्या. तरीही राजस्थान रॉयल्स (RR) त्याला संघात कायम ठेवण्याची शक्यता फारच कमी असल्याचे मानले जात आहे.
ट्रेंट बोल्ट- आयपीएल 2024 मध्ये ट्रेंट बोल्टची (Trent Boult) कामगिरी चांगली राहिली होती. त्याने 27.69च्या सरासरीने 16 विकेट्स घेतल्या होत्या. पण तो त्याच्या जुन्या शैलीत दिसला नाही. बोल्ट व्यतिरिक्त, आवेश खान (Avesh Khan) आणि संदीप शर्मा (Sandeep Sharma) यांनी राजस्थानसाठी चमकदार गोलंदाजी केली होती. त्यामुळे राजस्थान रॉयल्स ट्रेंट बोल्टला सोडणार असल्याचे मानले जात आहे.
ध्रुव जुरेल- आयपीएलमधील चमकदार कामगिरीनंतर ध्रुव जुरेलची (Dhruv Jurel) भारतीय कसोटी संघात निवड झाली. जुरेलने उत्कृष्ट फलंदाजी करण्याबरोबरच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट यष्टीरक्षणही केले होते. राजस्थान रॉयल्सकडे (RR) यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal), रियान पराग, संजू सॅमसन आणि रवी अश्विनसारख्या खेळाडूंचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे राजस्थान संघ जुरेलला सोडणार असल्याचे मानले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विजयाच्या नजीक असताना टीम इंडियातून 3 खेळाडू बाहेर, बीसीसीआयचा मोठा निर्णय
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआय सदस्याचे मोठे वक्तव्य!
श्रेयसने वर्कआउटचा व्हिडिओ शेअर करत निवड समितीवर साधला निशाणा! लिहिले, “मेहनतीची…”