---Advertisement---

नऊ वर्षांनंतर द्रविडचे राजस्थान रॉयल्समध्ये पुनरागमन, सीईओने जर्सी देऊन केले स्वागत

Rahul dravid rajasthan royals
---Advertisement---

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) 9 वर्षांनंतर राजस्थान रॉयल्समध्ये (Rajasthan Royals) परतले आहेत. द्रविड यांना आयपीएल 2025 पूर्वी संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. द्रविड यांनी राजस्थान रॉयल्ससोबत करार केला आहे. राजस्थान रॉयल्सकडून याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

द्रविडचे यांचे या संघाशी जुने नाते आहे. खेळाडू म्हणून आयपीएल कारकिर्दीत ते राजस्थानचे कर्णधार होते. यानंतर ते संघाचे मार्गदर्शकही बनलेले. द्रविड राजस्थाननंतर दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून सामील झालेले. अलीकडेच त्याच्या कोचिंगमध्ये भारतीय क्रिकेट संघाने टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपदही पटकावले होते.

राजस्थानचे मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर द्रविड मेगा लिलावादरम्यान महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतील. त्याचे संघाशी खूप चांगले संबंध आहेत. कर्णधार संजू सॅमसनही द्रविड यांच्या खूप जवळचा मानला जातो. द्रविड यांनी अंडर 19 दिवसांपासून संजू याच्यासोबत काम केले असून, संजूदेखील त्यांच्याविषयी कायम बोलत असतो.

द्रविड यांची आयपीएल कारकीर्द चमकदार राहिली आहे. आयपीएल 2012 आणि 2013 मध्ये ते राजस्थान रॉयल्सचे कर्णधार होते. यानंतरही तो आणखी दोन वर्षे संघाशी जोडला गेलेले. द्रविड 2014 आणि 2015 मध्ये संघाचे मार्गदर्शक आणि संचालक होते. त्यानंतर 2016 मध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये कार्यरत होते.

द्रविड यांनी आयपीएल संघांनंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची जबाबदारी वाहिली होती. 2019 मध्ये ते अकादमीचे प्रमुख झाले. यानंतर 2021 मध्ये त्यांना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले. आपल्या साडेतीन वर्षाच्या कारकिर्दी त्यांनी भारतीय संघासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यादरम्यान भारतीय संघाने दोन वेळा जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात प्रवेश केला. तर वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना देखील भारताने खेळला होता. आपल्या अखेरच्या स्पर्धेत त्यांनी भारतीय संघाला विश्वविजेते बनवले.

हेही वाचा – 

“भारतीय संघात सध्या दर्जेदार फिरकीपटू नाहीत”, वीरेंद्र सेहवागचे वादग्रस्त विधान!
भारत विरुद्ध बांगलादेश मालिका कधीपासून सुरू होणार? कोणत्या चॅनलवर दिसतील लाईव्ह सामने?
मुशीर खानचं नाव दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात अजरामर, नवदीप सैनीसोबत मिळून रचला अद्भुत रेकॉर्ड!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---