भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. भारताच्या दौऱ्यावर येणारा बांगलादेशचा संघ 2 कसोटी आणि 3 टी20 सामने खेळेल. मालिकेतील पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईत सुरू होणार आहे. ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळली जाईल. त्यामुळे दोन्ही संघाच्या दृष्टीनं ही मालिका खूप महत्त्वाची आहे. मालिकेतील सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही कुठे पाहू शकता, हे आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगतो.
तुम्ही भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेचं लाईव्ह स्ट्रीमिंग ‘स्पोर्ट्स 18 चॅनल’वर पाहू शकाल. त्याच वेळी, मोबाईलवर सामना पाहण्यासाठी तुम्हाला सोनी लिव्ह (Sony Liv) ॲप डाउनलोड करावं लागेल. सोनी लिव्हच्या माध्यमातून तुम्ही सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकाल. मालिकेसाठी दोन्ही संघांची घोषणा अद्याप झालेली नाही. काही दिवसांत संघांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजल्यापासून खेळले जातील. पहिली कसोटी 19 ते 23 सप्टेंबर दरम्यान तर दुसरी कसोटी 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान खेळली जाईल. यानंतर 3 टी20 सामने खेळले जातील. पहिला टी20 सामना 6 ऑक्टोबर, दुसरा टी20 सामना 9 ऑक्टोबर आणि तिसरा टी20 सामना 12 ऑक्टोबरला खेळला जाईल.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीनं टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. जर टीम इंडियानं मालिकेतील दोन्ही सामने जिंकले, किंवा एक सामना जिंकून एक सामना अनिर्णित राखला, तरी भारतीय संघ अव्वल स्थानावर राहील. परंतु जर टीम इंडियाचा मालिकेतील दोन्ही कसोटीत पराभव झाला, तर संघ WTC गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर घसरेल.
हेही वाचा –
मुशीर खानचं नाव दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात अजरामर, नवदीप सैनीसोबत मिळून रचला अद्भुत रेकॉर्ड!
आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे 5 फलंदाज; जाणून घ्या कोणा-कोणाचा समावेश
विकेटकीपरच्या चुकीची शिक्षा गोलंदाजाला, क्रिकेटच्या या अनोख्या नियमामुळे चाहते गोंधळात