---Advertisement---

इंग्लंडच्या द हंड्रेड लीगमध्ये भारतीय दिग्गजाची एंट्री, ‘या’ संघाचा हेड कोच म्हणून झाली नियुक्ती

On: मंगळवार, मार्च 10, 2026 3:54 PM
---Advertisement---

इंग्लंडची लीग द हंड्रेडचा नवा हंगाम २१ जुलैपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा १६ ऑगस्टपर्यंत रंगणार आहे. यंदा या लीगमध्ये अनेक बदल दिसणार आहेत. द हंड्रेडमध्ये एकूण आठ फ्रॅंचायजी आहेत. त्यामधील मॅनचेस्टर सुपर जायंट्स, एमआय लंडन, साऊथर्न ब्रेव्ह आणि सनरायजर्स लीड्स या संघांचे मालिक भारतीय आहेत. पहिल्यांदा या लीगमध्ये खेळाडूंचा लिलाव होणार आहे. हा लिलाव ११ आणि १२ मार्चला पार पडणार आहे. यामध्ये महिला आणि पुरुष खेळाडूंचा लिलाव होणार असून साऊथर्न ब्रेव्ह संघाने मोठा निर्णय घेतला आहे.

द हंड्रेड लीगचा संघ साऊथर्न ब्रेव्हने पुरुष संघासाठी त्यांच्या प्रशिक्षकांची घोषणा केली आहे. यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू आणि अनुभवी प्रशिक्षक हेमंग बदानी यांना संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) म्हणून नियुक्त केले आहे. तसेच इंग्लंडचा माजी सलामीवीर इयान बेल याला सहाय्यक प्रशिक्षकाची (असिस्टंट कोच) जबाबदारी दिली आहे. हा बदल यासाठी कारण जीएमआर ग्रुपने साऊथर्न ब्रेव्हचा ४९ टक्के भाग विकत घेतला आहे. तेव्हापासून संघाच्या प्रशिक्षकामध्ये दिल्ली कॅपिटल्सशी संबंधितांना प्राधान्या देण्यात आले आहे.

बदानी हे सध्या आयपीएलमध्ये (इंडियन प्रीमियर लीग) दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यामध्ये त्यांनी २०२५च्या हंगामात संघाला उत्तम सुरूवात करुन दिली होती, मात्र संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यात अपयशी ठरला. तसेच त्यांनी मेजर लीग क्रिकेटमध्ये सिएट ऑर्कास आणि आयएलटी २०मध्ये दुबई कॅपिटल्स संघासोबत काम केले आहे.

दुसरीकडे इयान बेल यालाही प्रशिक्षकाचा अनुभव आहे. ही लीग इंग्लंडमधील असल्याने परिस्थिती पाहून प्रशिक्षक विभागामध्ये घेतले आहे. तसेच त्याने बदानीसोबत दिल्ली कॅपिटल्समध्येही काम केले आहे.

बेलने इंग्लंडच्या १९ वर्षाखालील संघ आणि लायन्स संघासोबतही काम केले असून इंग्लंच्या श्रीलंका दौऱ्यात तो कसोटी संघाचा फलंदाजी प्रशिक्षक राहिला. २०२३च्या वनडे विश्वचषकाआधी त्याने न्यूझीलंड संघासोबतही काम केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---