---Advertisement---

टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये 780 षटकार मारले! टीम इंडियाचे शतक-संजूची कमाल, हार्दिकच्या नावावर लज्जास्पद रेकॉर्ड

On: मंगळवार, मार्च 10, 2026 10:24 AM
---Advertisement---

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत अनेक नवे विक्रम रचले गेले. एक महिन्यापासून खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत चौकार-षटकारांचा पाऊस पडला, ज्यामुळे मागील आवृत्त्यांमधील अनेक विक्रम मोडले गेले आहेत. टी२० विश्वचषकाच्या या दहाव्या हंगामात एकूण ७८० षटकार मारले गेले. हे एका आवृत्तीत सर्वाधिक ठरले आहे. यामध्ये भारताने तब्बल १०६ षटकार मारले आहेत. भारताने कधीही टी२० विश्वचषकात १०० पेक्षा अधिक षटकार मारले नाही. तसेच एका टी२० विश्वचषकात षटकारांची शंभरी केवळ भारताने गाठली आहे.

या स्पर्धेत २० संघ खेळले आणि त्यामध्ये एकूण ५५ सामने खेळले गेले. या स्पर्धेत १७५८२ धावा झाल्या. भारताच्या खेळाडूंनी अधिक षटकार मारले असून त्यामध्ये संजू सॅमसन सर्वात पुढे आहे. त्याने ५ सामन्यात २४ षटकार मारले आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीत ४० षटकांमध्ये एकूण ३४ षटकार मारले गेले. जे या विश्वचषकाच्या इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक ठरले आहेत.

भारताने सर्वाधिक षटकार मारल्याचा विक्रम आपल्या नावे केला, मात्र हार्दिक पांड्याने एक निराशाजनक विक्रम नोंदवला आहे. जे एका गोलंदाजासाठी वाईट आहे. या स्पर्धेत त्याच्याविरुद्ध सर्वाधिक षटकार मारले गेले आहेत. हार्दिकने या स्पर्धेत ९ सामने खेळले आहेत आणि सर्व फलंदाजांनी त्याच्याविरुद्ध एकूण २० षटकार मारले आहेत.

२०२४च्या टी२० विश्वचषकात ५१५ षटकार मारले होते. एका टी२० विश्वचषकाच्या हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम संजूच्या नावावर झाला आहे. तसेच टी२० विश्वचषकाच्या इतिसाहात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर आहे. त्याने ५० षटकार मारले आहेत.

या स्पर्धेत शतकांचाही विक्रम झाला आहे. पहिल्यांदाच एका टी२० विश्वचषकात सर्वाधिक शतके केली गेली आणि ती २०२६च्या हंगामात झाली. यामध्ये ६ फलंदाजांनी मिळून ७ शतके केली आहेत. त्यामधील पाकिस्तानचा साहिबजादा फरहानने २ शतके केली. तसेच न्यूझीलंडचा फिन ऍलन, इंग्लंडचा जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, श्रीलंकेचा पथुम निसांका आणि कॅनडाचा युवराज समरा यांनी शतकी खेळी केल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---