---Advertisement---

‘रॉयल नाम सुनकर आरसीबी समझे क्या? RCB नहीं…’, चेन्नईच्या पराभवानंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस

RR-vs-CSK
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्स संघ मागील वर्षीच्या उपविजेत्या राजस्थान रॉयल्स संघापुढे पुन्हा एकदा तोंडघशी पडला. आयपीएल 2023चा 37वा सामना गुरुवारी (दि. 27 एप्रिल) राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात रंगला होता. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात राजस्थानने चेन्नईचा 32 धावांनी पराभव केला. या पराभवासह राजस्थानने चेन्नईला या हंगामात सलग दुसऱ्यांदा पराभूत केले. यापूर्वी 17व्या सामन्यातही राजस्थानने चेन्नईला 3 धावांनी पराभूत केले होते. आता दुसऱ्यांदा पराभूत करताच राजस्थानने गुणतालिकेतील ‘टॉपर’ चेन्नईला पछाडत अव्वलस्थान काबीज केले. त्यामुळे चेन्नई तिसऱ्या स्थानावर घसरली. चेन्नईच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मजेशीर मीम्स व्हायरल होत आहेत.

सामन्याचा आढावा
या सामन्यात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी राजस्थानने निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 202 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाच्या नाकी नऊ आल्या. चेन्नईला यावेळी 20 षटकात 6 विकेट्स गमावत फक्त 170 धावाच करता आल्या. त्यामुळे राजस्थानने हा सामना 32 धावांनी खिशात घातला.

मीम्स व्हायरल
राजस्थानच्या या विजयानंतर त्यांच्या चाहत्यांनी चेन्नई संघावर निशाणा साधत त्यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. एका युजरने ट्वीटमध्ये फोटो शेअर केला. त्या फोटोवर लिहिले आहे की, “रॉयल नाव ऐकून आरसीबी समजला का? आरसीबी नाही, राजस्थान रॉयल्स आहे मी.”

https://twitter.com/VikramMoond/status/1651643062261800960?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1651643062261800960%7Ctwgr%5E2d549a2c79bb0bea8ceff9aa1f0a62c7e4d40b6c%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.cricketcountry.com%2Fhi%2Fnews%2Frajasthan-royals-beat-chennai-super-kings-by-32-runs-in-ipl-funny-memes-viral-on-social-media-1086167

याव्यतिरिक्त आणखी एकाने रजनीकांत यांच्या ‘शिवाजी- द बॉस’ सिनेमातील त्यांची क्लिप व्हायरल केली.

https://twitter.com/Mr_D_Memes/status/1651642898709102592?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1651642898709102592%7Ctwgr%5E2d549a2c79bb0bea8ceff9aa1f0a62c7e4d40b6c%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.cricketcountry.com%2Fhi%2Fnews%2Frajasthan-royals-beat-chennai-super-kings-by-32-runs-in-ipl-funny-memes-viral-on-social-media-1086167

तसेच, दुसऱ्या एकाने ट्वीट करत मीम शेअर केले. त्याला कॅप्शन देत लिहिले की, “जर खेळता येत नसेल, तर आमच्यासमोर येत नका जाऊ चेन्नईवाल्यांनो.”

गुणतालिकेत राजस्थान अव्वलस्थानी
या विजयानंतर राजस्थानने गुणतालिकेत 10 गुणांसह अव्वलस्थान पटकावले. विशेष म्हणजे, चेन्नई, राजस्थान आणि गुजरात टायटन्स यांचे 10 गुण आहेत. मात्र, राजस्थान चांगल्या नेट रनरेटच्या जोरावर पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला. याव्यतिरिक्त गुजरातने राजस्थान आणि चेन्नईच्या तुलनेत एक सामना कमी खेळला आहे. तरीही संघ 10 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. (rajasthan royals beat chennai super kings by 32 runs in ipl 2023 funny memes viral see here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रहाणेला उगाच नाही मिळाली टीम इंडियात जागा, समोर आला धोनीचा अँगल; लगेच वाचा
राजस्थानच्या घौडदौडीतील ‘ध्रुव’ तारा! फिनिशर म्हणून जुरेल पाडतोय भल्याभल्यांचा कंडका

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---