आयपीएल 2023 मध्ये बुधवारी (12 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना खेळला गेला. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावल्यामुळे राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. या संधीचे देखील सोने करत राजस्थानच्या फलंदाजांनी पावर प्लेमध्ये वेगवान धावा वसूल केल्या. यासोबतच त्यांनी आयपीएलच्या या हंगामात एक नवा पराक्रम देखील आपल्या नावे केला.
आपला तिसरा विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरलेल्या या दोन्ही संघातील नाणेफेक चेन्नईने जिंकली. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर राजस्थानची सुरुवात काहीशी खराब झाली. यशस्वी जयस्वाल दुसऱ्याच षटकात 10 धावा करत तंबूत परतला. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळालेल्या देवदत्त पडिकल याने आक्रमण केले. त्याला जोस बटलर याने देखील तशीच साथ दिली. दोघांनी पुढील चार षटकात 45 धावा कुटल्या. या दोघांनी पावर प्ले मध्ये संघाची धावसंख्या 1 बाद 57 पर्यंत पोहोचवली.
राजस्थान रॉयल्स या हंगामातील एकमेव संघ आहे ज्यांनी चारही सामन्यात पावर प्लेमध्ये 50 धावांचा टप्पा पार केला. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पहिल्या सामन्यात राजस्थानने एक गडी गमावत विक्रमी 85 धावा कुटल्या होत्या. त्यानंतर पंजाब विरुद्ध तीन गडी गमावले असतानाही 57 धावा बनवण्यात यश मिळवले होते. दिल्लीविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात यशस्वी जयस्वाल व बटलर यांनी 68 धावा बनवलेल्या. त्यानंतर आता चौथ्या सामन्यातही 57 धावा राजस्थानचे फलंदाज बनवू शकले.
(Rajasthan Royals Becomes First Team Who Hits Consecutive 50 Plus Runs In Powerplay In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“चार सामने खेळण्याचा फिटनेस नाही आणि 14 कोटी घेतो”, चहरवर संतापले शास्त्री
आयपीएल सुरू असताना आयसीसी टी-20 रँकिंग जाहीर, खराब फॉर्मातील सूर्यकुमार ‘या’ स्थानावर






