यंदाचा आयपीएल हंगाम जोरदार सुरू आहे. यामध्ये अनेक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) इतिहास रचला आहे. त्याने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पदार्पण केले आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी वयाच्या पदार्पणाचा रेकाॅर्ड केला. वैभव सूर्यवंशीने अतिशय धमाकेदार पद्धतीने पदार्पण केले. त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. याच कारणास्तव, वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाची खूप चर्चा होत आहे. राजस्थान रॉयल्सचे गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले यांनी याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आयपीएलच्या इतिहासात पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सने दिलेल्या संधीचा वैभवने पुरेपूर फायदा घेतला आणि पदार्पणाच्या सामन्यातच धमाकेदार कामगिरी करून एक मोठा रेकाॅर्ड रचला. डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वालसोबत डावाची सुरुवात करण्यासाठी वैभव सूर्यवंशी आला. त्याने पहिल्याच चेंडूवर शार्दुल ठाकूरला 80 मीटर लांब षटकार मारून सर्वांना आश्चर्यचकित केले.
यानंतर, या तरुण खेळाडूने पुढच्याच षटकात आवेश खानला लक्ष्य केले आणि षटकार मारून आपला हेतू व्यक्त केला. वैभव फक्त 20 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. त्याच्या या खेळीत त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकाने वैभव सूर्यवंशीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, “मला वाटते वैभव सूर्यवंशी हा एक अद्भुत मुलगा आहे. माझ्या मते, त्याच्याकडे जवळजवळ 360 अंशांचा खेळ आहे. या वयातही त्याचा दृष्टिकोन खूपच प्रभावी आहे. त्याला त्याचे शॉट्स खेळायचे आहेत. त्याला असे वाटत नाही की तो कोणत्याही विशिष्ट गोलंदाजाविरुद्ध खेळत आहे. त्याचा सिद्धांत असा आहे की चेंडूकडे पहा आणि तो मारा.”
Great Beginning! 6️⃣????
— Star Sports (@StarSportsIndia) April 19, 2025
14-year-old debutant #VaibhavSuryavanshi announces himself in style – smashing the very first ball he faces in the IPL for a SIX! ????
This is truly #IndianPossibleLeague ????????
Watch the LIVE action ➡ https://t.co/3WHRLHfS94 #IPLonJioStar ???? #RRvLSG | LIVE… pic.twitter.com/GeF8rnOLYD





