नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या लिलावानंतर (ipl 2022) क्रिकेटपंडित सर्व संघांचे मूल्यांकन करण्यात व्यस्त आहेत. कागदावर कोणता संघ सर्वोत्कृष्ट आणि कोणत्या संघाच्या कोणत्या विभागात काय कमतरता आहे, या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले जात आहे. लिलावात खरेदी केलेल्या गोलंदाजांबद्दल खूप चर्चा आहे. कारण त्यांच्यावर सर्वाधिक पैशांचा वर्षाव झाला आहे. १० कोटींचा टप्पा ओलांडलेल्या ११ खेळाडूंमध्ये ७ गोलंदाजांचा समावेश आहे. सर्वात मजबूत गोलदाजी कोणत्या संघाकडे आहे हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. दिल्ली कॅपिटल्स (delhi capitals) आणि मुंबई इंडियन्स (mumbai indians) संघ गोलंदाजीत सर्वात मजबूत असल्याचे बोलले जात आहे, पण या व्यतिरिक्त राजस्थान हा संघ या दोन संघांना टक्कर देऊ शकतो.
दिल्ली कॅपिटल्स
रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने एकमेव वेगवान गोलंदाज एन्रिक नॉर्किएला कायम ठेवले होते. आयपीएल २०२२ च्या लिलावात संघाने ८ गोलंदाजांना आणि ४ अष्टपैलूंना खरेदी केले आहे. आता दिल्ली संघात शार्दुल ठाकूर, कमलेश नागरकोटी, मुस्तफिजुर रहमान, लुंगी एन्गिडी, खलील अहमद, चेतन साकारिया आणि मिशेल मार्श या उत्तम वेगवान गोलंदाजांसह दिल्लीकडे अक्षर पटेल, कुलदीप यादव, विकी ओस्तवाल आणि ललित यादव हे फिरकी गोलंदाजीचे पर्याय आहेत. रबाडा आणि अश्विन हे संघातून बाहेर पडल्यानंतरही दिल्ली संघ खूपच मजबूत दिसत आहे.
मुंबई इंडियन्स
जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचे नेतृत्व करताना दिसेल. त्याला संघाने रिटेन केले आहे. तसेच संघाने ८ कोटी खर्च करून जोफ्रा आर्चरचा संघात समावेश केला आहे. पण तो आयपीएल 2022 मध्ये सहभागी होणार नाही. तसेच संघाने जयदेव उनाडकट, रिले मेरेडिथ, डॅनियल सॅम्स, बेसिल थम्पी आणि टायमल मिल्स हे वेगवान गोलंदाज घेतले आहेत. कायरन पोलार्डचाही याच संघात समावेश आहे. मुंबईच्या फिरकी गोलंदाजांमध्ये एम अश्विन, मयंक मार्कंडेय, फॅबियन ऍलन आणि टीम डेव्हिड हे खेळाडू आहेत.
राजस्थान रॉयल्स
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स हा संघ दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीशी स्पर्धा करण्याची शक्यता आहे. राजस्थानकडे वेगवान गोलंदाजांच्या रूपात ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, नवदीप सैनी, ओबेद मॅक्कॉय, जिमी नीशम आणि नॅथन कुल्टर नाईल हे खेळाडू आहेत. तसेच फिरकी गोलंदाजांमध्ये युझवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्विनसारखे अनुभवी खेळाडू आहेत.
महत्वाच्या बातम्या-
हार्दिकच्या भविष्याबाबत कर्णधार रोहितने केले महत्त्वाचे भाष्य; म्हणाला… (mahasports.in)