आगामी आयपीएल हंगामाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तत्पूर्वी ‘संजू सॅमसन’च्या (Sanju Samson) नेतृत्वाखाली ‘राजस्थान रॉयल्स’च्या (Rajasthan Royals) कामगिरीत सातत्य दिसले आहे. संघाच्या प्लेइंग इलेव्हन आणि गेममध्ये उत्स्फूर्तता दिसून आली. संघाने कदाचित जेतेपद पटकावले नसेल, पण त्याच्या नेतृत्वाखाली संघ सतत प्लेऑफमध्ये पोहोचत आहे. दरम्यान आता कर्णधार संजू सॅमसनने 2025च्या आयपीएलपूर्वी एक मोठी घोषणा केली आहे. ‘ध्रुव जुरेल’सोबत (Dhruv Jurel) विकेटकीपिंगची जबाबदारी वाटून घेणार असल्याचे त्याने म्हटले आहे.
‘एबी डिव्हिलियर्स’शी (AB De Villiers) बोलताना सॅमसनने याबाबत टीम मॅनेजमेंटशी बोलल्याचा खुलासा केला. संजूने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि जुरेल यांच्याशी चर्चा केली होती. सॅमसनने सांगितले की, धुरेल हा कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी विकेटकीपिंगचा पर्याय आहे. त्यामुळे त्याने आयपीएलमध्येही विकेटकीपिंग करावी.
एबी डिव्हिलियर्सच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना संजू सॅमसन म्हणाला, “मी हे कोणालाही सांगितले नाही. मी आधी म्हटल्याप्रमाणे खेळाडूंचा विचार करायला हवा. मला वाटते, ध्रुव जुरेल आता त्याच्या कारकिर्दीत कुठे आहे, तो एक कसोटी यष्टीरक्षक आहे आणि कधीतरी त्याने आयपीएलमध्येही ही जबाबदारी पार पाडावी.”
पुढे बोलताना तो म्हणाला, “यावर चर्चा झाली आहे. विकेटकीपिंगची जबाबदारी आम्ही आपापसात वाटून घेऊ. मी क्षेत्ररक्षक म्हणून कर्णधारपद भूषवलेले नाही. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, ‘ध्रुव, एक कर्णधार म्हणून तुझ्याबद्दल काय मत आहे ते मला चांगले समजले आहे, ते कसे होते ते आम्ही पाहू.’ संघावर कोणताही प्रभाव पडू नये. संघ प्रथम येतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियात विजय, दक्षिण आफ्रिकेला हरवले, मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान का यशस्वी?
वनडे आणि टी20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा, मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूकडे नेतृत्व
SA vs PAK; स्टेडियममध्ये मुलाचा जन्म झाला, प्रेम ही व्यक्त झाले, क्रिकेट फॅन्ससाठी सामना संस्मरणीय ठरला