---Advertisement---

वैभव सूर्यवंशीसाठी लिलावात राजस्थानने नाहीतर, ‘या’ संघाने लावली होती पहिली बोली

On: बुधवार, एप्रिल 8, 2026 12:16 PM
---Advertisement---

आयपीएल २०२५ चा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर, २०२४ ला सौदी अरेबियामध्ये झाला होता. या मेगा लिलावासाठी ५७४ खेळाडूंची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये १३ वर्षाचा वैभव सूर्यवंशीही होता. त्याचे नाव ४९१ व्या क्रमांकावर होते. या लिलावाआधी त्याच्याबाबत कुठेही चर्चा झाली नव्हती. लिलावाच्या दुसऱ्या दिवशीच्या एक्सलरेटेड ऑक्शनमध्ये (जलदगती लिलाव) त्याचा समावेश करण्यात आला.

आयपीएलपेक्षा कमी वय असलेल्या या खेळाडूला, वैभवला लिलावात एक कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत मिळाली. या युवा क्रिकेटपटूसाठी दोन संघांमध्ये चुरस निर्माण झाली होती. बोली १६ फेऱ्यांपर्यंत चालली आणि अखेरीस राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या संघात सामील केले. एक चकित करणारी बाब म्हणजे वैभवसाठी राजस्थानने बोली सुरू केली नव्हती. दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यासाठी पहिली बोली लावली होती.

लिलावात वैभवचा समावेश ३० लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह करण्यात आला होता. तो बिहार क्रिकेट असोसिएशनचा (बीसीए) सदस्य आहे. तोपर्यंत त्याने व्यावसायिक क्रिकेट खेळले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी पात्रतेचा निकष १५ वर्षे किंवा त्याहून अधिक वय असले तरी, भारतीय क्रिकेट किंवा आयपीएलमध्ये खेळण्यासाठी तसा काही नियम नाही. याचाच फायदा त्याला झाला आणि त्याची लिलावामध्ये निवड झाली.

राजस्थानने वैभवला १.१ कोटी रुपयांना विकत घेतले. दिल्लीने १ कोटी रुपयांची बोली लावल्यानंतर पुढे गेले नाही. तो आयपीएल लिलावात निवडला गेलेला सर्वात तरुण खेळाडू होता. हा लिलाव नोव्हेंबर २०२४ मध्ये झाला आणि आयपीएल २०२५ वेळी तो १४ वर्षांचा झाला. त्याने १९ एप्रिल २०२५ ला आयपीएलमध्ये पदार्पण केले.

वैभवने त्याच्या पहिल्याच सामन्यात २० चेंडूत ३४ धावा करत त्याचा इरादा स्पष्ट केला होता. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरूवातच षटकाराने केली होती. तसेच तिसऱ्याच सामन्यात ३८ चेंडूत १०१ धावा करत आयपीएलच्या इतिहासात सर्वात युवा शतकवीर बनला. चौथ्या सामन्यात शून्यावर बाद झाला आणि पाचव्या सामन्यात ४ धावा केल्या होत्या.

वैभवने आतापर्यंत १० आयपीएल सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ३७४ धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---