दिग्गज टेनिसपटू आणि आणि लाल मातीचा बादशाह राफेल नदालने नुकताच आपल्या कारकिर्दीतील १३ व्यांदा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत पुरुष एकेरीत 20 ग्रँडस्लॅम किताब जिंकले असून दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररच्या विक्रमाची बरोबरी केली. यातच राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू श्रेयस गोपालचा टेनिस खेळतानाचा व्हिडिओ राजस्थानच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तो ‘राफेल नदालला टक्कर देण्यास तयार आहे’ असे शीर्षक त्या व्हिडिओला देण्यात आले आहे.
राजस्थानने शेयर केलेल्या या व्हिडीओमध्ये श्रेयस टेनिस खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेयर करताना राजस्थानने लिहिले की, “फ्रेंच ओपनमध्ये राफेल नदालची विजयी मोहीम रोखणारा एकमेव माणूस.”
The only man who can end @RafaelNadal's #RolandGarros streak! 🎾 😅#HallaBol | #RoyalsFamily | @ShreyasGopal19 pic.twitter.com/lIZnGJPNa7
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) October 12, 2020
आयपीएल 2020 मध्ये श्रेयसने 7 सामने खेळले आहेत.या 7 सामन्यात त्याने 9 च्या इकॉनॉमीने धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या आहेत. 28 धावात 2 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
राजस्थान रॉयल्सने या हंगामातील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून चांगली सुरुवात केली होती. यानंतर या संघाला सलग चार सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर रविवारी (11 ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबादला पराभूत केल्यानंतर राजस्थान पुन्हा विजयी मार्गावर परतला आहे. राजस्थानचा पुढील सामना बुधवारी (14 ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. बलाढ्य दिल्लीविरुद्ध राजस्थान कशी कामगिरी करेल हे पाहावं लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-आयपीएल २०२०: चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश असावा ‘असे’ ३ खेळाडू
-चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स: पराभवानंतरही चेन्नईच्या खेळाडूंनी ‘हे’ विक्रम केले नावावर
-चक्क २० संघांकडून खेळलेला अष्टपैलू आज उतरणार चेन्नई सुपर किंग्सकडून मैदानात
ट्रेंडिंग लेख-
एकेकाळी क्रिकेटचं मैदान गाजवलेला विराटचा मित्र बिहारच्या राजकारणात ठरतोय ‘किंग’
आयपीएल २०२०: चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश असावा ‘असे’ ३ खेळाडू
स्वार्थी राजकारणामुळे देशाने गमावलेला अस्सल हिरा.! ७० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळलेले एकमेव खेळाडू