2025च्या आयपीएल (IPL) मेगा लिलावात (Mega Auction) राजस्थान रॉयल्सने (RR) वैभव सूर्यवंशीवर (Vaibhav Suryavanshi) मोठी बोली लावली. राजस्थानने वैभवला 1.10 कोटी रुपयांना विकत घेतले. तो मूळ किमतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त दराने विकला गेला. लिलावात विकला जाणारा वैभव हा सर्वात तरूण खेळाडू आहे. तो अवघ्या 13 वर्षांचा असून त्याने लहान वयातच अनेक रेकाॅर्ड केले आहेत.
वैभव सूर्यवंशीसाठी लिलावात दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सामना राजस्थानशी झाला. पण राजस्थानने बोली जिंकली. दिल्ली कॅपिटल्सने वैभववर पहिली बोली लावली होती. पण दिल्लीने एक कोटी रुपयांपर्यंतची शेवटची बोली लावली. राजस्थानने ते 1.10 कोटी रुपयांना विकत घेतले. वैभव सूर्यवंशीची मूळ किंमत फक्त 30 लाख रुपये होती.
वैभव हा मूळचा बिहारचा आहे. त्याने 2023 मध्ये रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने वयाच्या 12 वर्षे आणि 284 दिवसांमध्ये पदार्पण सामना खेळला. आता तो आयपीएलमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. वैभवने भारताच्या 19 वर्षांखालील संघासाठी विस्फोटक कामगिरी केली आहे. त्याने भारतासाठी शतक झळकावले. वैभवने चेन्नईमध्ये अंडर-19 ऑस्ट्रेलियन संघाविरूद्ध सामना खेळला होता. दरम्यान त्याने 62 चेंडूंचा सामना करत 104 धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL Mega Auction; धाकटा भाऊ विकला गेला, पण सरफराज खान ठरला अनसोल्ड!
IPL Mega Auction; मूळ किंंमतीत देखील विकले गेले नाहीत, ‘हे’ स्टार खेळाडू
आरसीबीसाठी झंझावाती शतक झळकावणाऱ्या स्टार खेळाडूचा मुंबई संघात समावेश