गुरुवारी (दि. 11 मे) कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स संघात आयपीएल 2023चा 56वा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी 7 वाजता कोलकाता विरुद्ध राजस्थान संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने जिंकली आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यात विजय मिळवून दोन्ही संघ प्ले-ऑफच्या शर्यतीत कायम राहण्याचा प्रयत्न करतील.
या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघ काही बदलांसह उतरणार आहे. कुलदीप यादव याच्या जागी ट्रेंट बोल्ट संघात परतला आहे. तसेच, मुरुगन अश्विन याच्या जागीही केएम आसिफ संघात सामील झाला आहे. तसेच, जो रूट चौथ्या स्थानी फलंदाजी करणार आहे. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्स संघातही एक बदल आहे. अनुकूल रॉय हा वैभव अरोराच्या जागी संघात सामील झाला आहे.
Sanju Samson wins the toss and @rajasthanroyals will bowl first against #KKR at the Eden Gardens.
Live – https://t.co/jOscjlr121 #TATAIPL #KKRvRR #IPL2023 pic.twitter.com/7SkVDTg2Qj
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2023
हंगामातील दोन्ही संघांची कामगिरी
आयपीएल 2023 स्पर्धेत संजू सॅमसन याच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. यातील 5 सामन्यात संघाला विजय मिळवता आला आहे, तर उर्वरित 6 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. असेच काहीसे नितीश राणा याच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्स संघाचेही आहे. कोलकातानेही 11 सामने खेळून 5 सामन्यात विजय, तर 6 सामन्यात पराभव पत्करला आहे. मात्र, नेट रनरेटच्या आधारे राजस्थान संघ (+0.388) गुणतालिकेत 10 गुणांसह पाचव्या स्थानी, तर कोलकाता संघ (-0.079) 10 गुणांसह सहाव्या स्थानी आहे. (Rajasthan Royals have won the toss and have opted to field against kkr ipl 2023)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
कोलकाता नाईट रायडर्स
रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), जेसन रॉय, वेंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
राजस्थान रॉयल्स
यशस्वी जयसवाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, केएम आसिफ, युझवेंद्र चहल
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘धोनीने आता थांबले पाहिजे’, विश्वविजेत्या कर्णधाराचे स्पष्ट मत
‘पृथ्वी शॉने अपेक्षेवर फेरले पाणी…’, CSKविरुद्धच्या पराभवानंतर रिकी पाँटिंगचे खळबळजनक वक्तव्य