रविवारी (दि. 23 एप्रिल) क्रिकेटप्रेमींना आयपीएल 2023 स्पर्धेत दोन सामने पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे. कारण, वीकेंड असल्यामुळे डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेतील 32वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. राजस्थान रॉयल्स संघात 3.30 वाजता खेळला जाईल. त्यानंतर 33वा सामना सायंकाळी 7.30 वाजता कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघ एकमेकांशी भिडतील. एम चिन्नास्वामी स्टेडिअमवरील 32व्या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी 3 वाजता नाणेफेक पार पडली. ही नाणेफेक राजस्थानने जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला.
संजू सॅमसन (Sanju Samson) याने नाणेफेक जिंकल्यानंतर स्पष्ट केले की, संघात कोणताही बदल नाहीये. त्यांना वाटलं, तर नंतर समावेश करतील. दुसरीकडे, बेंगलोर संघात एक बदल आहे. वेन पार्नेल संघातून बाहेर पडला आहे, तर त्याच्या जागी डेविड विली याला संघात जागा मिळाली आहे. तसेच, फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून खेळेल.
🚨 Toss Update 🚨@rajasthanroyals win the toss and elect to field first against @RCBTweets.
Follow the match ▶️ https://t.co/lHmH28JwFm#TATAIPL | #RCBvRR pic.twitter.com/H2rhfMIBeq
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2023
स्पर्धेतील कामगिरी
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने स्पर्धेत आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. त्यापैकी 3 सामन्यात विजय, तर 3 सामन्यात संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. यापैकी पंजाब किंग्सविरुद्धच्या एका सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याने संघाचे नेतृत्व करत विजय मिळवला होता. त्यानंतर विराट आता राजस्थानविरुद्धही कर्णधारपद भूषवताना दिसत आहे. सध्या बेंगलोर संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. तसेच, संजू सॅमसन याच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघाने 6 सामने खळले असून त्यापैकी 4 सामन्यात विजय, तर 2 सामन्यात पराभव पत्करला आहे. सध्या राजस्थान गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. (Rajasthan Royals have won the toss and have opted to field against royal challengers bangalore ipl 2023)
उभय संघातील प्लेइंग इलेव्हन
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
विराट कोहली (कर्णधार), फाफ डू प्लेसिस, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुयश प्रभुदेसाई, डेविड विली, वनिंदू हसरंगा, मोहम्मद सिराज, विजयकुमार विशक
राजस्थान रॉयल्स
जोस बटलर, यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, आर अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो पंड्या नेतृत्वात स्मार्ट, पण लखनऊ…’, पराभवानंतर दिग्गजाने पुन्हा साधला राहुलवर निशाणा
‘अर्जुन तेंडुलकरमुळेच हारली मुंबई इंडियन्स’, भारताच्या माजी दिग्गजाचे कारणासहित स्पष्टीकरण