आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. आयपीएल फ्रेचायझी राजस्थान रॉयल्सकडे आगामी हंगामासाठी एक भक्कम संघ आहे. राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक आणि आणि डायरेक्टर कुमार संगकारा याने त्यांच्या संघाविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. संगकाराच्या मते त्यांच्याकडे असा सक्षम संघ आहे, जो मागच्या तीन संघामातील खराब प्रदर्शनानंतर आगामी हंगामात चांगले प्रदर्शन करू शकतो.
मागच्या तीन हंगामात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघ सात, आठ आणि सात या क्रमांकावर होता. परंतु आगामी हंगामात संघाकडून अधिक चांगल्या अपेक्षा असणार आहेत.
श्रीलंका संघाचा माजी कर्णधार कुमार संगकारा (Kumar Sangakkara) म्हणाला की, ‘आम्हाला महिती आहे की, आम्हाला आमच्या संघासोबत ऑफ सत्रांमध्ये खूप काम करण्याची गरज होती. मला वाटते आम्ही त्या विभागांना ओळखू शकलो, ज्याठिकाणी काम करण्याची गरज होती आणि लिलावात खेळाडूंची निवड करताना योग्य प्रक्रिया केली. आम्ही आमच्यासाठी ठरवून दिलेले निकष पूर्ण करू शकलो. मला वाटते की फ्रँचायझीने एक मजबूत संघ निवडून अप्रतिम काम केले आहे.’
संघाच्या खेळाडूंविषयी प्रतिक्रिया देताना संगकारा पुढे म्हणाला की, युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांची उपस्थिती मोठा फरक तयार करेल.
तो पुढे बोलताना म्हणाला की, ‘चहल आणि अश्विनच्या रूपात आमच्याकडे लेग स्पिन आणि ऑफ स्पिनच्या बाबतीत आयपीएलचे दोन सर्वश्रेष्ठ स्पिनर्स आहेत. आमच्याकडे ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, नवदीप सैनी, नॅथन कुल्टर नाइल, ओबेद मॅकाय यांच्या रूपात वेगवान गोलंदाजांचे आक्रमण आहे. त्याची साथ देण्यासाठी यशस्वी जैयस्वाल, संजू सॅमसन आणि जोस बटलर आहेत, ज्यांना आम्ही रिटेन केले होते.
संगकाराच्या मते राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीकडे प्रत्येक विभागात गुणवंत खेळाडूंची भरमार आहे. त्यांच्या प्रत्येक विभागात सखोलता आहे, जेम्स निशम, मिशेल आणि रेसी वॅन डर ड्यूसेन उत्तम क्रिकेटपटू आहेत. आमच्याकडे काही युवा भारतीय क्रिकेटपटूही आहेत. महत्वाचे हे आहे की, आमचा संघ खूप सक्षम आहे, असे संगकारा पुढे बोलताना म्हणाला.
महत्वाच्या बातम्या –
ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप: भारताच्या लक्ष्य सेनचे पदक पक्के, पुलेला गोपीचंद यांच्या मुलीचाही विजय
धोनीबद्दल काय आहेत भावना? गंभीर म्हणतोय, ‘१३८ कोटी लोकांसमोर सांगू शकतो की…’
ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल बनला भारताचा ‘जावईबापू’, लग्नाचे PHOTO आले समोर