आयपीएल २०२० हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाने निराशाजनक कामगिरी केली होती. पण आता आगामी हंगामात चेन्नई संघ आपले चौथे जेतेपद मिळवण्यासाठी कसून सराव करत आहे. या हंगामात चेन्नई संघाने इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला ७ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे.
काही दिवसांपूर्वी मोईन अलीच्या जर्सी वरील मद्य उत्पादन करणाऱ्या कंपनीचा लोगो काढून टाकल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले होते. अशात प्रसिद्ध लेखिका तस्लीमा नसरीन या मोईन अलीबद्दल वादग्रस्त ट्विट करत टिकेच्या धनी ठरल्या आहेत. यानंतर आता राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने तस्लीमा यांच्यावर निशाणा साधला आहे.
तस्लीमा यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत आर्चरने लिहिले आहे की, ‘तुम्ही खरोखरच ठीक आहात का. मला नाही वाटत तुम्ही ठीक आहात.’
https://twitter.com/JofraArcher/status/1379409054087397377?s=20
काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाची नवीन जर्सी लाँच करण्यात आली होती. या जर्सीवर एसएनजी १०००० या मद्य उत्पादन करणाऱ्या कंपनीचा लोगो होता. त्यामुळे मोईन अलीने त्याच्या जर्सी वरून हा लोगो काढून टाकण्याची मागणी केली होती. अशी चर्चा रंगली होती. त्यांनतर चेन्नई सुपर किंग्ज संघाचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी स्पष्ट केले होते की, मोईन अलीने लोगो काढून टाकण्याची मागणी केली नव्हती.
यानंतर तस्लीमा नसरीन यांनी वादग्रस्त ट्विट करत लिहिले होते की, “मोईन अली जर क्रिकेट खेळत नसता तर तो सीरियामध्ये जाऊन आयएसआयएस अतिरेकी बनला असता.”
तस्लीमा नसरीन यांच्या या ट्विटर ट्विटरकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील अनेक प्रतिक्रिया या नकारात्मक आहेत. हे पाहता तस्लीमा यांनी त्यांचे ट्विट डिलिट केले आहे.

कोण आहेत तस्लीमा नसरीन?
तस्लीमा नसरीन या आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. मुळच्या बांगलादेशच्या असलेल्या ५८ वर्षीय लेखिका मुख्यतः आपल्या लेखनामुळे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या लेखांमुळे त्यांना अनेकदा मुस्लिम समूदायकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे त्यांना आपला देश सोडावा लागला होता. त्यांना स्विडेन देशाचे नागरिकत्व घ्यावे लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! आयपीएलपुर्वी आरसीबीच्या चितेंत भर, पड्डीकलनंतर ‘हा’ अष्टपैलू कोरोनाच्या विळख्यात
बड्या खेळाडूने निवडले आयपीएल इतिहासातील ५ दिग्गज फलंदाज, गेल-धोनीला दिलं नाही स्थान






