शुक्रवारी (18 मे) इंडियन प्रीमियर लीग 2023 चा 66 वा सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 5 बाद 187 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानने हे लक्ष्य 19.4 षटकांमध्ये 6 विकेट्सच्या नुकसानावर गाठले. राजस्थानला या सामन्यात विजय मिळाला असला तरी त्यांचा सर्वात अनुभवी फलंदाज जोस बटलर याला पुन्हा एकदा खाते खोलण्यात अपयश आले. त्यासोबतच त्याच्या नावे आयपीएल इतिहासातील सर्वात लाजिरवाणा विक्रम जमा झाला.
विजयासाठी मिळालेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र, दुसऱ्याच षटकात रबाडा याने बटलरला शून्यावर पायचित केले. बटलर सलग तिसऱ्या सामन्यात खाते खोलण्यात अपयशी ठरला. संपूर्ण हंगामात पाच वेळा तो शून्यावर बाद झाला. एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा तो फलंदाज ठरला.
बटलर 2016 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. तेव्हापासून तो 2022 पर्यंत एकदाच शून्यावर बाद झाला होता. मात्र, या हंगामात तो पाच वेळा खाते खोलू शकला नाही. यापूर्वी हर्षल गिब्स, मनिष पांडे, निकोलस पूरन, मिथुन मन्हास व शिखर धवन हे एका हंगामात चार वेळा शून्यावर बाद झालेले.
मागील हंगामात सर्वाधिक धावा केलेला बटलर या हंगामात मात्र धावांसाठी झगडताना दिसला आहे. त्याने 14 सामन्यांमध्ये तीन अर्धशतकांच्या मदतीने 392 धावा केल्या.
(Rajasthan Royals Jos Buttler Five Duck In IPL 2023 Its Worst Record In IPL History)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO । आपल्याच चेंडूवर बोल्टने पकडला अप्रतिम झेल, शतकवीर फलंदाज स्वस्तात बाद
इंग्लिश दिग्गज म्हणतोय, “विराटपेक्षा क्लासेनचे शतक सरस”, दिले हे कारण