इंडियन प्रीमीयर लीग २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याला युएईमध्ये सुरुवात झाली. या टप्प्यातील तिसऱ्याच सामन्यात रोमांच पाहायला मिळाला. पहिले दोन सामने काहीसे एकतर्फी झाल्यानंतर तिसरा सामना मात्र, अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला. हा तिसरा सामना झाला पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघात. अखेरच्या क्षणापर्यंत विजयाची आशा सोडू नये, याची प्रचिती देणारा हा सामना ठरला.
या सामन्यात राजस्थानने केवळ २ धावांनी विजय मिळवला. राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो २० वर्षीय कार्तिक त्यागी. त्याने या सामन्यात ४ षटकांत २९ धावा देत २ विकेट्स घेतल्या. दोन्ही विकेट्स त्याने अगदी मोक्याच्या क्षणी घेतल्या. त्याने पंजाबला अखेरच्या षटकात केवळ ४ धावांची गरज असताना आणि त्यांच्या हातात ८ विकेट्स असताना केवळ १ धाव देत या विकेट्स घेतल्या आणि राजस्थानचा विजय निश्चित केला.
कार्तिकचा अखेरच्या षटकात धमाका
या सामन्यात पंजाबने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले होते. मयंक अगरवाल आणि केएल राहुलने शतकी भागीदारी करत पंजाबला दमदार सुरुवात दिली होती. त्यानंतरही एडेन मार्करम आणि निकोलस पूरनने अर्धशतकी भागीदारी करत विजयाकडे वाटचाल केली होती. पण, कार्तिकने अखेरच्या षटकात १ धावच दिल्याने सामना राजस्थानने जिंकला.
अखेरच्या षटकात मार्करम आणि पूरन फलंदाजी करत होते. त्यावेळी पंजाबला विजयासाठी केवळ ४ धावांची गरज होती. यावेळी त्यागी गोलंदाजीसाठी आला. त्याने पहिला चेंडू लो फुलटॉस टाकला. यावर मार्करमला एकही धाव घेता आली नाही. त्यापुढच्या चेंडूवर मार्करमने एकेरी धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर त्यागीने २२ चेंडूत ३२ धावा करणाऱ्या पूरनला चकवले. चेंडू पूरनच्या बॅटची कड घेत यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या हाती गेला आणि पूरनला विकेट गमवावी लागली.
त्यानंतर दीपक हुडा फलंदाजीसाठी आला. त्याने षटकातील चौथ्या चेंडूवर एकही धाव काढली नाही. त्यामुळे पंजाबसाठी विजयासाठी २ चेंडूत ३ धावा असे समीकरन झाले. पण, त्यागीने टाकलेल्या पाचव्या चेंडूवर हुडा चूकला आणि सॅमसनकडे झेल देऊन शून्यावर बाद झाला. अखेरच्या चेंडूवर ३ धावांची गरज असताना पंजाबकडून नवीन फलंदाज फॅबियन ऍलेन स्ट्राईक घ्यावी लागली. अखेरच्या चेंडू त्यागीने यॉर्कर टाकला, ज्यावर एकही धाव निघाली नाही. त्यामुळे राजस्थानने हा सामना २ धावांनी जिंकला.
https://twitter.com/imAmanDubey/status/1440381041714204680
WHAT. A. WIN! 👏 👏
Simply stunning how @rajasthanroyals have pulled off a two-run victory from the jaws of defeat. 👌 👌
Scorecard 👉 https://t.co/odSnFtwBAF #VIVOIPL #PBKSvRR pic.twitter.com/16m71yzAOW
— IndianPremierLeague (@IPL) September 21, 2021
@tyagiktk take a bow!
The best final over in t20s I've ever seen!#PBKSvRR #KartikTyagi pic.twitter.com/bTlOtKh3nc— Aniket Shinde (@theaniketshinde) September 21, 2021
मयंकचे अर्धशतक व्यर्थ
या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सर्वबाद १८५ धावा केल्या. राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ४९ धावा केल्या. तसेच महिपाल लोमरोरने ४३ आणि एविन लुईने ३६ धावांची आक्रमक खेळी केली. तर, पंजाबकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. याशिवाय मोहम्मद शमीने ३ विकेट्स घेतल्या, तर इशान पोरेल आणि हरप्रीत ब्रारने प्रत्येकी १ विकेट घेतली.
त्यानंतर १८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला २० षटकांत ४ बाद १८३ धावाच करता आल्या. पंजाबकडून मयंक अगरवालने सर्वाधिक ६७ धावा केल्या. तर, केएल राहुलने ४९ धावा केल्या. तसेच एडेन मार्करमने नाबाद २६ धावा केल्या आणि निकोलस पूरनने ३२ धावा केल्या. राजस्थानकडून कार्तिक त्यागीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच चेतन साकारिया आणि राहुल तेवातियाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
कॅप्टन्स इनिंगसह धोनी, विराट व रोहितला न जमलेली कामगिरी राहुलने दाखवली करून