---Advertisement---

आयपीएल २०२१च्या उर्वरित हंगामावर टांगती तलवार? पाहा काय म्हणाले राजस्थान रॉयल्सचे संघमालक

On: शनिवार, मे 15, 2021 7:54 AM
---Advertisement---

आयपीएल 2021 स्पर्धा कोरोना वायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. स्पर्धेदरम्यान खेळाडू आणि इतर कर्मचारी सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह आढळत होते. त्यामुळेच हा मोठा निर्णय घेण्यात आला. आता पुन्हा आयपीएल स्पर्धा केव्हा खेळली जाईल, याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. यादरम्यानच राजस्थान रॉयल्सचे मालक मनोज बदाले यांनी आयपीएलच्या उर्वरित हंगामाबद्दल काही माहिती दिली आहे.

एका ऑनलाईन कार्यक्रमात आयपीएलबद्दल बोलताना ते म्हणाले की, “आयपीएल 2021 चे पुन्हा आयोजन करणे आव्हानात्मक असेल. यावर्षी टी-20 वर्ल्डकपच्या अगोदर अथवा नंतर आयपीएलचे आयोजन करण्याची अंधुक शक्यता आहे. आयपीएलच्या बायोबबलमध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याने या वर्षीची स्पर्धा स्थगित करण्यात आली होती.”

“मला वाटते की आयपीएल होण्यासाठी योग्य वेळ शोधणे हे आव्हान असेल. सध्या खेळाडू खूप जास्त क्रिकेट खेळत आहेत. कोरोनामुळे यावर्षी क्रिकेटचा संपूर्ण कार्यक्रम खूपच व्यस्त आहे. जगभरातील क्रिकेट बोर्ड अधिकाधिक स्पर्धा आणि कसोटी सामने आयोजित करू इच्छित आहेत.” असे त्यांनी पुढे म्हटले.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे संचालक ॲशले जाईल यांनी आधीच स्पष्ट केले होते की, आयपीएल पुन्हा एकदा सुरू झाल्यावर त्याचे खेळाडू त्यात खेळू शकणार नाहीत. कारण इंग्लंड संघाला सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानचा दौरा करावा लागणार आहे. इतकेच नाही तर टी-20 विश्वचषकानंतर त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅशेस मालिका देखील खेळावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये ‘हे’ भारतीय खेळाडू ठरतील गेमचेंजर; दिग्गजाने वर्तवला अंदाज

Video: ‘पुजाराला तिथे टाळ्या वाजवण्यासाठी उभे नाही केले,’ जेव्हा धोनीने लाईव्ह सामन्यात जडेजाला म्हटले होते असे काही

टीम इंडियाकडे हार्दिक पंड्या आहेच, पण संघाला माझीही तेवढीच गरज; ‘या’ अष्टपैलूचे मोठे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---