आयपीएल 2024 च्या 19व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स समोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं आव्हान होतं. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सची टीम एका नव्या किटमध्ये मैदानात उतरली. याशिवाय राजस्थान रॉयल्स फाऊंडेशननं ग्रामीण भागात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना हा सामना पाहण्यासाठी आमंत्रित केलं होतं.
सामन्याच्या पूर्वसंध्येला राजस्थान रॉयल्सनं जाहीर केलं होतं की ते त्यांचं ‘पिंक प्रॉमिस’ पाळतील. यजमानांनी या सामन्यामध्ये पूर्ण गुलाबी जर्सी परिधान केली, ज्याद्वारे ते ग्रामीण राजस्थानमधील सशक्त महिलांना पाठिंबा दर्शवत होते. वास्तविक, राजस्थान रॉयल्स फाउंडेशनचं एक उद्दिष्ट आहे, ज्याचं नाव आहे ‘महिला असेल तर भारत आहे’. या अंतर्गत तिकीट आणि जर्सीमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून देणगी दिली जाते. ‘पिंक प्रॉमिस’ अंतर्गत, ‘महिला पुढे गेली तर भारत पुढे जाईल’ हे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
उल्लेखनीय आहे की राजस्थान रॉयल्सनं ‘पिंक प्रॉमिस’ उपक्रमाद्वारे देशातील सर्व सशक्त महिलांचा सन्मान करण्यासाठी ही जर्सी परिधान केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना ग्रामीण भागात सौरऊर्जेला चालना द्यायची आहे. या सामन्यात मारलेल्या सर्व षटकारांच्या बदल्यात राजस्थानच्या ग्रामीण भागात सौरऊर्जा बसवण्यात येणार आहे. सामन्यादरम्यान मारलेल्या एका षटकाराच्या बदल्यात राजस्थानातील गावांमधील 6 घरांमध्ये सौर पॅनेल बसवण्यात येणार आहेत.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं निर्धारित 20 षटकांत 3 गडी गमावून 183 धावा केल्या. आरसीबीकडून विराट कोहलीनं आयपीएल कारकिर्दीतील 8वं शतक ठोकलं. त्यानं 72 चेंडूत नाबाद 113
धावा केल्या. तर कर्णधार फाफ डू प्लेसिसनं 33 चेंडूत 44 धावांचं योगदान दिलं. बंगळुरूचे इतर फलंदाज मात्र फ्लॉप ठरले. राजस्थानकडून युजवेंद्र चहलनं 4 षटकांत 34 धावा देत 2 बळी घेतले.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2024 मधील पहिलं शतक, ‘किंग कोहली’नं जयपूरमध्ये पाडला धावांचा पाऊस!
‘रन मशीन’ कोहली थांबायचं नाव घेईना! आयपीएलमध्ये रचला आणखी एक इतिहास; आसपासही कोणी नाही!
ग्राउंड्समनच्या मुलानं केलं आरसीबीसाठी आयपीएल पदार्पण! जाणून घ्या कोण आहे सौरव चौहान