काही दिवसांपुर्वी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चेन्नई सुपर किंग्स संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा केन रिचर्डसन या लीगमधून बाहेर पडला. आता राजस्थान रॉयल्स संघाचीही चिंता वाढली आहे. त्यांच्या चिंतेचे कारण, संघातील दिग्गज आणि सर्वात महागडा खेळाडू बेन स्टोक्स आहे. कारण, त्याच्या आयपीएलमधील उपस्थितीबाबत अनेक प्रश्न उभे होत आहेत. Rajasthan Royals Player Ben Stokes Will Never Play In IPL 2020
स्टोक्स आपल्या घरी न्यूझीलंडला परत गेला आहे. त्याच्या वडिलांना ब्रेन कॅन्सर झाला आहे, त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी तो त्यांच्याकडे गेला आहे. स्टोक्सने नुकताच खुलासा केला होता की, “त्याच्या वडीलांना कॅन्सर असल्याची बातमी कळल्यानंतर तो जवळपास एक आठवडा नीट झोपू शकला नव्हता.”
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ४ सप्टेंबरपासून ३ सामन्यांच्या टी२० मालिकेची सुरुवात होणार आहे. पण सध्या हा २९ वर्षीय खेळाडू आपल्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठी उपलब्ध नसल्याचे दिसत आहे. अशात त्याच्या आयपीएलमध्ये खेळण्यावरही सावट पसरले आहे. असे असले तरी, स्टोक्सने आयपीएलबाबत अजून कसलेही अधिकृत विधान केलेले नाही. परंतु, राजस्थान रॉयल्सची इच्छा आहे की, त्याने लवकरात लवकर ही गोष्ट स्पष्ट करावी. जेणेकरुन संघाला त्याच्याजागी योग्य पर्यायी खेळाडू शोधला येईल.
स्टोक्स गेल्या २ हंगामांपासून राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. २०१८सालच्या आयपीएल खेळाडूंच्या लिलावात संघाने त्याला १२.५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याने राजस्थान रॉयल्सकडून २२ सामने खेळत ३१९ धावा आणि १४ विकेट्सची नोंद आपल्या खात्यात केली आहे. आयपीएलच्या पहिल्याच हंगामात राजस्थान संघाने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत आयपीएल ट्रॉफी पटकावली होती. त्यानंतर त्यांना हे यश मिळवता आले नाही. यंदा हा संघ आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी – मुबंई इंडियन्सला धक्का! लसिथ मलिंगा आयपीएलच्या १३ व्या हंगामातून बाहेर
‘तुम्ही इथे मजा मस्ती करायला नाही, आयपीएल खेळायला आलाय,’ विराट कोहली संतापला
‘सुरेश रैनासाठी पैसा महत्त्वाचा नाही’, दिग्गजाची सीएसकेच्या संघमालकावर कडाडून टीका
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमधील ५ अशा टीम, ज्यांनी खेळाडूंवर खर्च केलाय पाण्यासारखा पैसा
असे ५ परदेशी क्रिकेटर, जे आयपीएलमधून कमवतात सर्वाधिक पैसे
आयपीएलमध्ये ‘या’ ५ खेळाडूंना मिळाले क्षमतेपेक्षाही अधिक पैसे, पण कामगिरीच्या बाबतीत मात्र…